बेपत्ता ‘AN-32’ विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस जाहीर

भारतीय वायू सेनेचं बेपत्ता मालवाहू विमान एएन-32 बाबत माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर करण्यात आलं. एअर ईस्टर्न एअर कमांडचे मार्शल आर.डी. माथुर यांनी याबाबत घोषणा केली.

बेपत्ता 'AN-32' विमानाची माहिती देणाऱ्याला पाच लाखांचं बक्षीस जाहीर
Follow us
| Updated on: Jun 09, 2019 | 9:38 AM

नवी दिल्ली : भारतीय वायू सेनेचं बेपत्ता मालवाहू विमान एएन-32 बाबत माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्याचं जाहीर करण्यात आलं. एअर ईस्टर्न एअर कमांडचे मार्शल आर.डी. माथुर यांनी याबाबत घोषणा केली. याबाबत जो कुणी खरी माहिती देईल त्याला बक्षीस दिलं जाईल. या विमानाबाबत माहिती कळवण्यासाठी चार नंबर जारी करण्यात आले आहेत. 0378- 3222164, 9436499477, 9402077267, 9402132477 या चार क्रमांकावर तुम्ही या विमानाची माहिती देऊ शकता.

13  लोकांसोबत विमानाने उड्डाण केलं होतं

वायू सेनेचं मालवाहू विमान एएन-32 हे गेल्या सोमवारी (3 जून) बेपत्ता झालं होतं. या विमानात 13 लोक होते. सोमवारी दुपारी 12.27 वाजता याने आसामच्या जोरहाट येथून अरुणाचल प्रदेशसाठी उड्डाण केलं होतं. त्यानंतर 1 वाजताच्या सुमारास या विमानाशी संपर्क तुटला. वायू सेना या विमानाचा पत्ता लावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अज्ञापही या विमानाबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही. वायू सेनेचे हेलिकॉप्टर, ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट, यूएव्ही, सेन्सर्स आणि नौदलातील P8I एअरक्राफ्ट हे सर्वच या विमानाच्या शोध कार्यात लागलेले आहेत. त्याशिवाय सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं, रडार, ऑप्टिकल, सेन्सर्स आणि सॅटेलाईटचीही मदत घेतली जात आहे.

वातावरण अनुकूल नसल्याने तपासात अडचण

वातावरण उड्डाणाला अनुकूल नसल्याने शोधकार्यात अडचण येत असल्याचं विमानाच्या शोधकार्यात असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. घटनास्थळावरुन संकेत पाठवणाऱ्या ‘Sabre-8’ इमरजन्सी लोकेटर ट्रान्समीटर्स (ELT) बेकॉनमध्ये आता केवळ 36 तासापर्यंत सक्रिय राहाण्याची बॅटरी आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

सिग्नल पकडण्याचा प्रयत्न

हा विमान क्रॅश झाला असेल, तर त्याच्या संभाव्य जागेहून इन्फ्रारेड आणि लोकेटर ट्रान्समीटरमधून मिळणाऱ्या संकेतांना पकडण्याचा प्रयत्न विशेष करत आहेत. फोटो आणि टेक्निकल सिग्नलच्या आधारे काही खास बिंदुंवर कमी उंचीवर हेलिकॉप्टर तपास करत आहेत. मात्र, इतक्या प्रयत्नांनंतरही अज्ञाप या विमानाबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाही.

संबंधित बातम्या :

भारतीय हवाई दलाचे AN-32 विमान बेपत्ता

पत्नी कंट्रोल रुममध्ये ड्युटीवर, पायलट पतीचं विमान बेपत्ता

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.