राजस्थानमध्ये वायूसेनेचं लढाऊ विमान कोसळलं

| Updated on: Jul 05, 2019 | 4:09 PM

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारतीय वायू सेनेचं लढाऊ विमान मिग 27 कोसळलं आहे. सध्या या झालेल्या अपघाताबद्दल अजून काही माहिती समोर आलेली नाही. शिवगंजजवळील घराना गावात हे विमान कोसळलं आहे. आपल्या रुटीन मिशन दरम्यान या विमानाचा अपघात झाला आहे. याआधीही राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात वायूसेनेच्या मिग 21 विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात पायलटने उडी मारुन […]

राजस्थानमध्ये वायूसेनेचं लढाऊ विमान कोसळलं
Follow us on

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूरमध्ये भारतीय वायू सेनेचं लढाऊ विमान मिग 27 कोसळलं आहे. सध्या या झालेल्या अपघाताबद्दल अजून काही माहिती समोर आलेली नाही.

शिवगंजजवळील घराना गावात हे विमान कोसळलं आहे. आपल्या रुटीन मिशन दरम्यान या विमानाचा अपघात झाला आहे. याआधीही राजस्थानच्या बीकानेर जिल्ह्यात वायूसेनेच्या मिग 21 विमानाचा अपघात झाला होता. या अपघातात पायलटने उडी मारुन स्वत:चा जीव वाचवला होता.

राजस्थानच्या बिकानेर येथे भारतीय वायूसेनेचं मिग 21 विमान कोसळलं आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणाले, “बीकानेरजवळ एअरबेस उड्डाण घेत असताना विमानाला एक पक्षी धडकला. यामुळे हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच एअरफोर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली”.

भारतीय वायूसेनेचं लाढाऊ विमान मिग-21 बिकानेर येथून वायूसेनेच्या नाल हवाई अड्डयावरुन नियमीतप्रमाणे उड्डाण घेतल्यावर त्याचाही अपघात झाला होता. लढाऊ विमान मिग-21 बिकानेरपासून अंदाजे 12 किलोमीटर लांब शोभासर येथे कोसळलं होतं. या अपघातात पायलटने उडी मारुत स्वत:चा जीव वाचवला होता.