खुशखबर ! विद्यार्थ्यांना मिळणार नवा कोरा ‘डिझाईनर गणवेश’

शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून २७ शालेय वस्तू मोफत देण्यात आलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना गणवेशदेखील देण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी पालिकेकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे.

खुशखबर ! विद्यार्थ्यांना मिळणार नवा कोरा डिझाईनर गणवेश
विद्यार्थ्यांना मिळणार चक्क डिझाईन केलेला गणवेश
| Edited By: | Updated on: Apr 05, 2022 | 4:41 PM

मुंबई : पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण (Education) आणि उत्तम सुविधा देण्यासाठी पालिका सतत काहीना काही उपाययोजना, उपक्रम राबवत असते. आता पालिका एका नव्या उपक्रमासह आली आहे. विद्यार्थ्यांना (Students) नव्या शैक्षणिक वर्षात नवा कोरा आकर्षक आणि चक्क डिझाईन केलेला गणवेश (Designer School Uniform) मिळणार आहे. शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून २७ शालेय वस्तू मोफत देण्यात आलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांना गणवेशदेखील देण्यात येणार आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी पालिकेकडून समितीची स्थापना करण्यात आली आहे. पालिका अधिकारी, शिक्षक, ड्रेस डिझायनरचा यात समावेश आहे. लवकरच ही समिती नव्या रंगसंगतीचा गणवेश सुचवणार असल्याची माहिती शिक्षण सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिलीये.

विद्यार्थ्यांना हा गणवेश मोफत

समितीने गणवेशाचे चार सॅम्पल निवडले आहेत यातील एका सॅम्पलवर शिक्कामोर्तब करण्यात येईल. विद्यार्थ्यांना हा गणवेश मोफत दिला जाणार आहे. पुढच्या आठवडाभरात यासंदर्भात अंतिम निर्णय होणार असल्याचं पालिका प्रशासनानं सांगितलंय.

गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून शाळांबद्दलची माहिती देण्यात येणार

पालिका शाळेत देण्यात येणाऱ्या सुविधा, दर्जेदार शिक्षण यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. हीच पटसंख्या आणखी वाढावी या उद्देशाने गुणवंत विद्यार्थ्यांची निवड करून शाळांबद्दलची माहिती देण्यात येणार आहे. हे गुणवंत विद्यार्थी शाळेत मिळणारे शिक्षण, सुविधा, संधी, सर्वांगीण विकासासाठी मिळणारी संधी याबाबतची माहिती देणार आहेत.

विद्यार्थ्यांची संख्या वाढली

सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचं अजित कुंभार यांनी सांगितलंय. दोन वर्षात पालिकेतील विद्यार्थ्यांची संख्या २६ हजारांनी वाढली आहे.

इतर बातम्या :

मोहीम फत्ते : कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने मिटला खरिपाचा प्रश्न, बियाणाच्या बाबतीत शेतकरी आत्मनिर्भर

Punjab National Bank | पीएनबीचा ग्राहकांना झटका, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा बँक बचतीवरील व्याजदरात कपात

‘PNB’चा आपल्या ग्राहकांना मोठा धक्का, सलग दुसऱ्या महिन्यात व्याज दरात कपात