मोहीम फत्ते : कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने मिटला खरिपाचा प्रश्न, बियाणाच्या बाबतीत शेतकरी आत्मनिर्भर

लातूर जिल्ह्यात 33 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उत्पादित झाले आहे. विक्रमी क्षेत्रावर पेरा आणि विक्रमी उत्पादन असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागाने केलेले आवाहन आणि शेतकऱ्यांचे प्रयत्न यामुळे प्रथमच खरिपात शेतकऱ्यांना बियाणाचा तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

मोहीम फत्ते : कृषी विभागाचे आवाहन अन् शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने मिटला खरिपाचा प्रश्न, बियाणाच्या बाबतीत शेतकरी आत्मनिर्भर
यंदा उन्हाळी हंगामात एकूण क्षेत्रापैकी 50 टक्के क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा आहे.Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 4:22 PM

लातूर : यंदाच्या वर्षात निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असले तरी दुसरीकडे शेतकऱ्यांनी केलेले नियोजन कामी आले आहे. (Kharif Season) खरीप हंगामात पावसामुळे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनला सर्वाधिक फटका बसला होता. त्यामुळे सोयाबीनच्या दर्जावर परिणाम झाल्याने (Seed Production) बियाणे तयार करायचे कसे असा सवाल उपस्थित झाला होता. पण जे खरिपात झाले नाही ते (Rabi Season) रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी करुन दाखवले आहे. मुबलक पाणी आणि पोषक वातावरणामुळे उन्हाळी हंगामात प्रथमच सोयाबीनचा विक्रमी पेरा झाला होता. यामुळे शेतऱ्यांना उत्पन्न तर मिळणार आहेच पण खरिपातील बियाणाचाही प्रश्न निकाली निघत आहे. लातूर जिल्ह्यात 33 हजार क्विंटल सोयाबीन बियाणे उत्पादित झाले आहे. विक्रमी क्षेत्रावर पेरा आणि विक्रमी उत्पादन असा दुहेरी फायदा शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी विभागाने केलेले आवाहन आणि शेतकऱ्यांचे प्रयत्न यामुळे प्रथमच खरिपात शेतकऱ्यांना बियाणाचा तुटवडा भासणार नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

खरिपात 45 हजार हेक्टरावर सोयाबीन

लातूर जिल्ह्यात ऊसानंतर सर्वात अधिकच्या क्षेत्रावर सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात खरिपाचे सर्वसाधारण क्षेत्र हे 6 लाख हेक्टर एवढे आहे. पैकी 45 हजार हेक्टरावर सोयाबीनचा पेरा केला जातो. यामुळे दरवर्षी सोयाबीन बियाणाची आवक ही करावीच लागते. आगामी खरिपासाठी महामंडळाकडून 45 हजार व खाजगी कंपन्याकडून 75 हजार असे एकूण 1 लाख 20 हजार क्विंटल कृषी विभागाकडे आहे. असे असतानाही दरवर्षीची परस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने उन्हाळी हंगामात सोयाबीनचा पेरा करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसारच शेतकऱ्यांनी सोयाबीनवर भर दिला होता.

हेक्टरी 15 क्विंटलचा उतारा

उन्हाळी हंगामात सोयाबीनचा उतारा हा कमीच असतो. कारण बिगर हंगामात उत्पादन घेतल्याचा हा परिणाम असल्याचे सांगितले जाते. पण सोयाबीन बाबत असे घडले नाही. पोषक वातावरण आणि मुबलक पाणीपुरवठा यामुळे सोयाबीन बहरात होते. योग्य नियोजनामुळे हेक्टरी 15 क्विंटलचे उत्पादन होत असल्याचे जिल्हा गुणनियंत्रक विलास मिस्किन यांनी सांगितले आहे. जो उतारा खरिपात नाही तो यंदा उन्हाळी हंगामात मिळालेला आहे. यंदा प्रथमच उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात पीक पध्दतीमध्ये बदल झाला होता. शिवाय शेतकऱ्यांनी हा प्रयोग यशस्वी करुन दाखवला आहे.

33 हजार क्विंटल बियाणे तयार

उन्हाळी हंगामात 2 हजार 164 हेक्टरावर सोयाबीनचा पेरा झाला होता. हंगामाच्या सुरवातीला अवकाळीचे संकट ओढावले होते पण यातूनही सोयाबीन सावरले. यानंतर मात्र, पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांचे योग्य नियोजन यामुळे उत्पादनात वाढ होणार हे अपेक्षित होते. हेक्टरी 15 क्विंटलचा उतारा पडल्याने या क्षेत्रातून 33 हजार क्विंटलचे उत्पादन झाले आहे. बियाणासाठी वापरण्यात येणाऱ्या सोयाबीनला अधिकचा दर असतो. यंदा सोयाबीन बियाणाला 100 रुपये किलो असा दर आहे. म्हणजेच जिल्ह्यात तब्बल 33 कोटींचे बियाणे तयार झाले आहे.

संबंधित बातम्या :

Latur Market : हरभऱ्याची आवकही वाढली अन् दरही, शेतकऱ्यांचे लक्ष सोयाबीनवरच

Drone Farming : ड्रोन शेतीमध्ये सुविधांपेक्षा अडचणी अधिक, शेतकऱ्यांसमोर काय आहेत अडचणी?

Onion Rate: कांदा दारचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर, 3 एकरावरील उभ्या पिकावर फिरवला नांगर

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.