जळगावात भीषण अपघात, ट्रक आणि ओमनीच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू

जळगावातील एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात (Jalgaon accident) झाला आहे.

जळगावात भीषण अपघात, ट्रक आणि ओमनीच्या धडकेत 7 जणांचा मृत्यू
| Updated on: Dec 23, 2019 | 5:33 PM

जळगाव : जळगावातील एरंडोलजवळ महामार्ग क्रमांक 6 वर भीषण अपघात (Jalgaon accident) झाला आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी आहेत. महामार्गावर आयशर ट्रक आणि ओमनी यांची समोरासमोर धडक झाल्याने हा थरारक अपघात झाला.

या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर तर तीन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातामुळे (Jalgaon accident)  महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.  सर्व मृत हे एरंडोल शहरासह तालुक्यातील उत्राण येथील रहिवाशी आहेत.

हॉटेल प्रियंकाजवळ आज दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन महिलांचाही समावेश आहे.

ट्रकने ओमनी कारला समोरासमोर धडक दिली. ट्रकचा एक्सल तुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला.