Maharashtra Lock Down | ‘मैं समाज का दुश्मन हूं…’, संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून धडा

| Updated on: Mar 24, 2020 | 4:14 PM

संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्यांना मारझोड करुनही फरक पडत नसल्याने जळगाव पोलिसांनी गांधीगिरी करत अनोखी शक्कल लढवली आहे.

Maharashtra Lock Down | मैं समाज का दुश्मन हूं..., संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्यांना पोलिसांकडून धडा
Follow us on

जळगाव : कोरोना विषाणूचा अटकाव होत (Jalgaon Police Gandhigiri During Curfew) नसल्याने राज्य सरकारने राज्यभरात निवासी भागात कलम 144 नुसार संचारबंदी लागू केली आहे. मात्र, जळगाव शहरात संचारबंदीचे सर्रासपणे उल्लंघन सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. संचारबंदीत बाहेर फिरणाऱ्यांना मारझोड करुनही फरक पडत नसल्याने जळगाव पोलिसांनी (Jalgaon Police Gandhigiri During Curfew) गांधीगिरी करत अनोखी शक्कल लढवली आहे.

विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांच्या हाती पोलिसांनी  ‘मैं समाज का दुश्मन हूं, घर में नही बैठुंगा…’ असे फलक दिले आहेत. या प्रकाराचे चित्रीकरण तसेच छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

हेही वाचा : तब्बल 15 जण डिस्चार्जच्या वाटेवर, राजेश टोपेंची महाराष्ट्राला गुड न्यूज

कोरोनाला लढा देण्यासाठी राज्य सरकारने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे कारवाईसाठी आता (Jalgaon Police Gandhigiri During Curfew) पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर लाठीचार्ज केला जात आहे. त्याचप्रमाणे मोठ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई सुरु आहे. नागरिक कोणत्याही ठोस कारणाविना घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना लाठ्यांचा प्रसाद देत पिटाळून लावले.

मात्र, तरीही नागरिकांच्या मानसिकतेत बदल होत नसल्याने पोलिसांनी थेट गांधीगिरी करायला सुरुवात केली आहे. ‘मैं समाज का दुश्मन हूं, घर में नही बैठुगा…’ असे फलक विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांच्या हाती देत पोलिसांनी त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. अनेक जण हे फलक पाहून चांगलेच खजील झाले.

काहींना उठबशा काढण्याची शिक्षा

राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिक बाहेर पडत असल्याने पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. जळगावात ठिकठिकाणी कारवाई सुरु आहे. पोलीस आदेश न पाळणाऱ्या नागरिकांना लाठ्यांचा प्रसाद देत आहेत. काहींना उठबशा (Jalgaon Police Gandhigiri During Curfew) काढण्याचीही शिक्षा केली जात आहे.

मुंबईत आणखी एक कोरोना बळी, राज्यातील मृतांचा आकडा चारवर 

मुंबईत आणखी एका ‘कोरोना’ग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यूएईहून अहमदाबादला परतलेल्या 65 वर्षीय वृद्धाचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. महाराष्ट्रातील चौथ्या बळीची नोंद झालेली आहे.