श्रीदेवींच्या आठवणीत जान्हवीची इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचा दुबई येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर भावुक झाल्याचे दिसत आहे. तिने सोशल मीडियावर सर्वांन भावुक करेल असा प्रेमळ फोटो शेअर करत छान अशी पोस्ट लिहिली आहे. जान्हवीने आपल्या ईन्स्टाग्राम […]

श्रीदेवींच्या आठवणीत जान्हवीची इंस्टाग्रामवर भावुक पोस्ट
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांची आज पुण्यतिथी आहे. गेल्यावर्षी 24 फेब्रुवारी 2018 रोजी श्रीदेवी यांचा दुबई येथील एका हॉटेलमध्ये मृत्यू झाला. त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने श्रीदेवी यांची मुलगी अभिनेत्री जान्हवी कपूर भावुक झाल्याचे दिसत आहे. तिने सोशल मीडियावर सर्वांन भावुक करेल असा प्रेमळ फोटो शेअर करत छान अशी पोस्ट लिहिली आहे.

जान्हवीने आपल्या ईन्स्टाग्राम अकाऊंटवर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो शेअर केला आहे. तो फोटो पाहून तुम्ही अंदाज लावू शकता की, या फोटोमध्ये जान्हवी आणि श्रीदेवी आहे.  या फोटोमध्ये श्रीदेवी यांनी जान्हवीला आपल्या कुशीत घेतल्याचे दिसत आहे. “माझं ह्रदय नेहमीच जड झालेलं असतं. पण मी चेहऱ्यावर हसू ठेवून वावरते. कारण त्या ह्रदयात तू वास करत आहेस”, अशी भावनिक पोस्ट तिने फोटोसोबत लिहिली आहे.

दरम्यान गेल्यावर्षी 24 फेब्रूवारी 2018 ला श्रीदेवी यांचे दुबईमध्ये एका हॉटेलमधील बाथरुममध्ये बुडून दुर्देवी मृत्यू झाला होता. अचानक झालेल्या या घटनेने संपूर्ण देश हळहळला होता. श्रीदेवींच्या चाहत्यांनाही या घटनेने धक्का बसला होता.

“आईच्या जाण्याने मला खुप धक्का बसला, अजूनही मी त्यातून बाहेर पडू शकली नाही”, असं जान्हवी कपूरने एका मुलखतीमध्ये सांगितले होते.