अमर सिंहांसोबतचे ते फोटो पाहून आत्महत्येचा विचार होता: जया प्रदा

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई: बॉलिवूड गाजवून राजकारणात सक्रीय झालेल्या अभिनेत्री जया प्रदा (Actress Jaya Prada) यांनी आपल्या करियरमधील घडामोडींचा धांडोळा घेतला. एका कार्यक्रमात जया प्रदा यांनी अनेक खुलासे केले. समाजवादी पक्षातून हकालपट्टी झालेले नेते अमर सिंह यांना जया प्रधान गॉडफादर मानतात. अमर सिंह यांना राखी बांधली तरी लोक त्यांच्याबाबत अफवा पसरवणं बंद करणार नाहीत, असं जय प्रदा म्हणाल्या.  […]

अमर सिंहांसोबतचे ते फोटो पाहून आत्महत्येचा विचार होता: जया प्रदा
Follow us on

मुंबई: बॉलिवूड गाजवून राजकारणात सक्रीय झालेल्या अभिनेत्री जया प्रदा (Actress Jaya Prada) यांनी आपल्या करियरमधील घडामोडींचा धांडोळा घेतला. एका कार्यक्रमात जया प्रदा यांनी अनेक खुलासे केले. समाजवादी पक्षातून हकालपट्टी झालेले नेते अमर सिंह यांना जया प्रधान गॉडफादर मानतात. अमर सिंह यांना राखी बांधली तरी लोक त्यांच्याबाबत अफवा पसरवणं बंद करणार नाहीत, असं जय प्रदा म्हणाल्या.  इतकंच नाही तर जया प्रदा यांनी सपा नेते आणि रामपूरचे आमदार आझम खान यांच्यावर गंभीर आरोप केले. आझम खान यांनी आपल्यावर अॅसिड हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा जया प्रदा यांनी केला.

माजी खासदार जया प्रदा यांनी सपातून हकालपट्टी झालेल्या अमर सिंह (Jaya Prada-Amar Singh) यांच्यासोबत राष्ट्रीय लोक मंचची स्थापना केली होती. अमर सिंह आणि जया प्रदा यांच्या संबंधांबाबतच्या अफवावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. जया प्रदा म्हणाल्या, “माझ्या आयुष्यात अनेकांनी मला मदत केली आहे. अमिरसिंहजी माझे गॉडफादर आहेत”.

मुंबईतील क्वींसलाइन लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये (Queensline literature fest in Mumbai) जया प्रदा बोलत होत्या.

“ज्या परिस्थितीत मी एक महिला या नात्याने आझम खानसोबत निवडणूक लढत होते, त्यावेळी माझ्यावर अॅसिड हल्ला आणि हत्येचा धोका होता. मी घरातून बाहेर पडल्यानंतर मी घरी परतेन की नाही हे सुद्धा सांगू शकत नव्हते” असं जया प्रदा म्हणाल्या.

सपाचे तत्कालिन प्रमुख मुलायम सिंहांनी मला एकही फोन केला नाही. माझे फोटो एडिट करुन आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले, तेव्हा माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता, अशी धक्कादायक माहितीही जया प्रदा यांनी दिली.

अमर सिंह डायलिसिसवर होते. त्यावेळी माझे फोटो द्वेषाने पसरवले जात होते. मी अक्षरश: रडत होते, मला जगायची इच्छा नव्हती, आत्महत्येचा विचार सुरु होता. त्यावेळी मला कुणाचाही पाठिंबा मिळाला नाही. डायलिसिस झाल्यानंतर केवळ अमर सिंह यांनीच मला धीर दिला. त्यांच्याबद्दल काय विचार करु? गॉडफादर की आणखी काही? मी त्यांना राखी जरी बांधली तरी लोक अफवा पसरवणं बंद करणार नाहीत, असं जया प्रदा म्हणाल्या.