डान्स फ्लोअरवर मेहुणी, फॅन झाले जिजा! परफॉर्मन्स बघून केला पैशांचा पाऊस, बघा व्हिडीओ

आता ही मेहुणी बघा, या मेहुणीचं आणो तिच्या दाजींचं नातं हे खूप अनोखं आहे. हे नातं जसं रील वर्ल्डमध्ये पाहायला मिळतं, तसंच रिअल लाईफमध्येही मस्ती, हसणं आणि भरपूर फ्लर्टिंग असतं कारण दाजींसाठी आपली मेहुणी नेहमीच खास असते.

डान्स फ्लोअरवर मेहुणी, फॅन झाले जिजा! परफॉर्मन्स बघून केला पैशांचा पाऊस, बघा व्हिडीओ
Jija saali dance
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 04, 2023 | 11:07 AM

सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, अशा तऱ्हेने जुने आणि मजेशीर व्हिडिओ पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागले आहेत. युजर्सलाही अशा कंटेंटचा आनंद घ्यायला आवडतो. विशेषत: जेव्हा हा व्हिडिओ लग्न समारंभादरम्यान दाजी आणि मेहुणी यांच्यात झालेल्या मजेशीर गोष्टीशी संबंधित असतो किंवा मेहुणीच्या डान्स व्हिडिओशी संबंधित असतो. हे व्हिडिओ असे आहेत की युजर्सला ते पुन्हा पुन्हा बघायला आवडतात. सध्या मेहुणीच्या अशाच एका व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आता ही मेहुणी बघा, या मेहुणीचं आणो तिच्या दाजींचं नातं हे खूप अनोखं आहे. हे नातं जसं रील वर्ल्डमध्ये पाहायला मिळतं, तसंच रिअल लाईफमध्येही मस्ती, हसणं आणि भरपूर फ्लर्टिंग असतं कारण दाजींसाठी आपली मेहुणी नेहमीच खास असते. सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मेहुणीच्या बिनधास्त डान्सने लोकांना इतके आश्चर्यचकित केले की आता हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतोय.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दाजी आणि मेहुणी डान्स फ्लोअरवर मनमोकळेपणाने नाचताना दिसत आहेत. मेहुणी आपल्या अभिनयाने तिथली महफिल लुटत असताना दाजी सुद्धा आपल्या मेहुणीवर नोटांचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्यांची मेहुणीची केमिस्ट्री लोकांना विशेष आवडते. आता हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या दोघांची ही क्यूट केमिस्ट्री पाहून लोकं हा व्हिडीओ जबरदस्त शेअरही करत आहात.

इन्स्टाग्रामवर @amar.086 नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. एका युजरने असे म्हटले की, असे काहीतरी फक्त भारतीय लग्नातच पाहायला मिळते, तर दुसऱ्या युजरने हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मजा आली असे लिहिले.