कोरोना संकटातून धडा, केडीएमसी 500 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार, महासभेत विषय मंजूर

कोरोना संकटातून धडा शिकून आता लवकरच केडीएमसी सुसज्ज 500 बेड्सचे हॉस्पिटल, त्याला जोडून मेडीकल कॉलेज उभारणार आहे (KDMC will build 509 bed hospital).

कोरोना संकटातून धडा, केडीएमसी 500 बेड्सचे सुसज्ज हॉस्पिटल उभारणार, महासभेत विषय मंजूर
Follow us
| Updated on: Nov 08, 2020 | 3:30 PM

ठाणे : केडीएमसीत आरोग्य यंत्रणेची अवस्था प्रचंड बिकट असल्याचं कोरोना संकट काळात उघड झालं. कोरोना विरोधात झुंज देण्यासाठी आयुक्त विजय सुर्यवंशी यांना विशेष मेहनत घ्यावी लागली. त्यानंतर कोरोना संकटातून धडा शिकून आता लवकरच केडीएमसीला सुसज्ज 500 बेड्सचे हॉस्पिटल, त्याला जोडून मेडीकल कॉलेज उभारले जाणार आहे. इतकेच नाही तर केडीएमसीची सर्व कार्यालये एका छत्राखाली आणण्याकरीता नेतिवली टेकडी नजीक ग्रीन बिल्डींग उभारली जाणार असल्याची माहिती आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे (KDMC will build 509 bed hospital).

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात दोन सरकारी रुग्णालये आहेत. डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालय आणि कल्याणमध्ये रुक्मीणीबाई रुग्णालय. या दोन्ही रुग्णालयांची अवस्था बिकट होती. आरोग्य यंत्रणेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र, कोरोना काळात प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सुरळीत करण्यासाठी चांगली मेहनत घेतली. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95 टक्क्यांवर पोहोचलं (KDMC will build 509 bed hospital).

केडीएमसी आयुक्तांनी खाजगी डॉक्टर आणि सरकारी यंत्रणेच्या मदतीने कोरोनाविरोधात झुंज दिली. केडीएमसी प्रशासनाने कोव्हिड केअर सेंटर आणि रुग्णालयांचा जंबो सेटअप उभारला. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, केडीएमसीत आरोग्य यंत्रणा सज्ज करण्याकरीता आयुक्तांनी प्रचंड प्रयत्न केले.

दरम्यान, शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत तीन महत्त्वाचे विषय मंजूर करण्यात आले. पीपीई तत्त्वावर 509 बेडचे सुसज्ज रुग्णालये उभारणे, एक मोठे मेडीकल कॉलेज उभारणे, हो दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यासाठी एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट या तत्वावर निविदा मागण्यात  येणार आहेत.

केडीएमसी मुख्यालयाची जागा विक्री करुन त्यातून महापालिकेस जवळपास 320 कोटी रुपये उत्पन्न मिळू शकतो. मुख्यालयाची इमारत नेतीवली येथील जागेत उभी केली जाईल. त्यामुळे एकाच छत्राखाली सर्व कार्यालये येतील. या इमारत उभारण्यासाठी 55 कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज आहे.

हेही वाचा : कल्याण-डोंबिवलीत विकास कामं रखडली, भाजप नगरसेवकांचं पालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.