किम जोंगच्या निशाण्यावर तीन देश, रासायनिक शस्त्रांची कुंडली समोर

| Updated on: Aug 20, 2020 | 11:10 PM

किम जोंग अणु बॉम्बच्या धाकाने अमेरिका आणि जपानला घाबरवतो. मात्र, या खेपेला उत्तर कोरियातल्या अणु बॉम्बची भीती नाही.

किम जोंगच्या निशाण्यावर तीन देश, रासायनिक शस्त्रांची कुंडली समोर
Follow us on

मुंबई : अणु बॉम्बचं बटण खिशात घेऊन फिरणाऱ्या किम जोंगबाबत एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे (Kim Jong Un Chemical Weapon). किम जोंग अणु बॉम्बच्या धाकाने अमेरिका आणि जपानला घाबरवतो. मात्र, या खेपेला उत्तर कोरियातल्या अणु बॉम्बची भीती नाही. यापुढचे युद्ध किम जोंग बंदूक किंवा बॉम्बने नाही, तर रासायनिक शस्त्राने लढण्याच्या बेतात आहे (Kim Jong Un Chemical Weapon).

अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या रिपोर्टनुसार किम जोंगकडे रासायनिक शस्त्रांचा मोठा साठा आहे. या घडीला जगात रासायनिक शस्त्रांच्या संख्येत उत्तर कोरियाचाच तिसरा नंबर लागतो. रिपोर्टमधल्या दाव्यानुसार, तब्बल 5 हजार टन वजनाचे 20 रासायनिक शस्त्र किम जोंगच्या शस्त्र भंडारात पडून आहेत. रासायनिक शस्त्रांचा इतका साठा साऱ्या जगाला हैराण करण्यासाठी पुरेसा आहे.

अमेरिकेच्या सैन्य मुख्यालयाने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. त्यात किम जोंगकडच्या रासासनिक शस्त्रांची कुंडली समोर आली आहे. उत्तर कोरिया तोफेच्या गोळ्यांमधून सुद्धा रासायनिक शस्त्रांचा मारा करु शकतो, अशी भीती सुद्धा त्यात वर्तवली गेली आहे. रासायनिक शस्त्र ही कोरोनासारखीच अदृश्यं असतात. काही मिनिटात ते हवेत पसरतात आणि हजारो लोकांचा श्वास गुदमरुन मृत्यू होतो. उदाहरणार्थ 1 किलो इतकं अ‍ॅथ्रेक्स नावाच्या केमिकल वेपनमध्ये 50 हजार लोकांना मारण्याची क्षमता असते (Kim Jong Un Chemical Weapon).

रासायनिक शस्त्रांच्या हल्ल्यासाठी किम जोंगच्या निशाण्यावर तीन देश आहेत. पहिला अमेरिका, दुसरा जपान आणि तिसरा दक्षिण कोरिया, हे तिन्ही देश किम जोंगच्या निशाण्यावर आहेत.

किम जोंगला चीनवर कधीही हल्ला होण्याची भीती आहे. जर चीनवर हल्ला झाला, तर अमेरिका आणि जपान एकत्रपणे लढतील. किम जोंगला याचीच चिंता आहे. कारण, अमेरिका आणि जपान हे चीनसोबत लढताना उत्तर कोरियाचा सुद्धा हिशेब चुकता करतील. त्यामुळे आधीपासून किम जोंगनं विनाशाची तयारी करुन ठेवली आहे.

Kim Jong Un Chemical Weapon

संबंधित बातम्या :

आधी पाकिस्तानच्या जवानांना झोडपलं, आता पुन्हा झापलं, चीन-पाकिस्तानच्या दोस्तीत कुस्ती सुरुच

सौदी अरेबियाला दिलेली धमकी पाकिस्तानला महागात, डॅमेज कंट्रोलसाठी लष्कर प्रमुखांना जाण्याची वेळ

चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी