कोल्हापूरचा मामा ‘नाद्या बाद’! धावपटू भाचा जिंकल्याने हवेत गोळीबार

भाचा 50 किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत विजयी झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी मामाने चक्क हवेत गोळीबार केला.

कोल्हापूरचा मामा नाद्या बाद! धावपटू भाचा जिंकल्याने हवेत गोळीबार
| Updated on: Feb 11, 2020 | 11:09 AM

कोल्हापूर : कोल्हापुरी गड्यांचा नाद करायचा नाही, असं गमतीने म्हटलं जातं. मात्र कोल्हापुरातील एका मामाने खरोखरच ही समजूत सार्थ ठरवली आहे. भाचा धावण्याच्या स्पर्धेत विजयी झाल्याने मामा अश्विन शिंदे यांनी हवेत गोळीबार (Kolhapur Uncle Firing in the air) केला.

कोल्हापुरात राहणाऱ्या या सदगृहस्थाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. शिंदेंचा लाडका भाचा 50 किलोमीटरच्या धावण्याच्या स्पर्धेत जिंकला. भाच्याच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यासाठी मामाने चक्क हवेत गोळीबार केला.

कोल्हापुरातील उचगाव परिसरातल्या भरवस्तीमध्ये दिवसाढवळ्या हा उन्मादी जल्लोष झाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विशेष म्हणजे हवेत गोळीबार करतानाचा व्हिडीओही शूट करण्यात आला आहे. विजेत्या तरुणाच्या मामाने चार वेळा हवेत गोळीबार करुन जल्लोष केला.

हवेत गोळीबार झाल्यानंतर भीतीपोटी परिसरातील नागरिकांनी दरवाजे बंद करुन घेतल्याचं म्हटलं जातं. त्यामुळे गोळीबार (Kolhapur Uncle Firing in the air) करणारा मामा अश्विन शिंदे यांच्यावर कोल्हापूर पोलिस कारवाई करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

पाहा व्हिडीओ :