गणेशोत्सवाला कोकणात जाताय? कोकण रेल्वेचं बुकिंग फुल्ल!

| Updated on: Aug 23, 2019 | 7:06 PM

रत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी याचे वेगळं समीकरणं आहे. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळगावी जातो. मात्र कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी थोडी चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण गणेशोत्सवासाठी चार महिने आधीच कोकण रेल्वेचं बुकिंग फुल्ल झालं आहे. केवळ काही मिनिटात आज दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचं नियमित गाड्यांचं आरक्षण हाऊसफुल्ल झालं आहे. यंदा 2 […]

गणेशोत्सवाला कोकणात जाताय? कोकण रेल्वेचं बुकिंग फुल्ल!
Follow us on

रत्नागिरी : कोकणातील गणेशोत्सव आणि मुंबईतला चाकरमानी याचे वेगळं समीकरणं आहे. मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणातील मूळगावी जातो. मात्र कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्याचं प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी थोडी चिंतेत टाकणारी बातमी आहे. कारण गणेशोत्सवासाठी चार महिने आधीच कोकण रेल्वेचं बुकिंग फुल्ल झालं आहे. केवळ काही मिनिटात आज दुसऱ्या दिवशीही कोकण रेल्वेचं नियमित गाड्यांचं आरक्षण हाऊसफुल्ल झालं आहे.

यंदा 2 सष्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. कोकणातला गणेशोत्सव हे एक वेगळं आकर्षण असतं. कोकणातल्या गणेशोत्सवाला एक दिवस का होईना चाकरमानी हजेरी लावतो. चाकरमान्यांची कोकणात येण्यासाठी आणि जाण्यासाठीची भिस्त कोकण रेल्वेवर अवलंबून असते. गणेशोत्सवासाठी कोकणात येण्यासाठी 120 दिवस आगोदर कोकण रेल्वेचं आरक्षण करता येऊ शकते. त्यासाठी आरक्षणाला कालपासून सुरुवात झाली. त्यामुळे 2 सप्टेंबरच्या गणेशोत्सवासाठी आदल्या दिवशी निघण्याचं प्लॅनिंग करत असाल तर थांबा. कारण आज सलग दुसऱ्या दिवशी कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झालं आहे. पण कोकण रेल्वेच्या काऊंटरवरून जवळपास सर्वच गाड्यांचे आरक्षण रिग्रेट दाखवलं जात आहे.

नियमित धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणाची स्थिती –

कोकण कन्या एक्स्प्रेस- 1 सप्टेंबरची आरक्षण स्थिती  3 एसी- 135 वेटिंग

स्लिपर क्लास- 411 वेटिंग,

2 एसी – 39 वेटिंग

तुतारी एक्स्प्रेस- आरक्षण रिग्रेट (फुल्ल) 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर

मांडवी एक्स्प्रेस- आरक्षण रिग्रेट 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर

जनशताब्दी एस्क्प्रेस- आरक्षण रिग्रेट 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर

मत्स्यगंधा एकस्प्रेस- आरक्षण रिग्रेट 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर

तेजस एक्स्प्रेस- 1 सप्टेंबर 1 एसी 15 आणि 2 एसी- 84

मुंबईतून तसेच कोकणातून कोकण रेल्वेच्या आरक्षण केंद्रावर आरक्षण मिळेल या हेतूने सकाळपासून अनेकजण आरक्षणाच्या प्रतीक्षेत होते. तासन् तास लांब रांगेत उभं राहून सुद्धा कोकण रेल्वेचं आरक्षण अवघ्या काही तासात हाऊसफुल्ल होतंय. रांगेत पहिल्या पाचमध्ये सुद्धा उभं राहून हातात वेटिंगची  तिकिटे पडत असल्याचं चाकरमानी सांगत आहेत.

सिटिंग किंवा स्लिपर रेल्वे गाड्यांमध्ये वेटिंग शिवाय तिकीट नाही. तर अनेक गाड्यांचे तिकीट सध्या रिग्रेट म्हणून दाखवतंय. ऑनलाईन आरक्षणादरम्यानही हीच परिस्थिती आहे. कोकण रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या गाड्यांचे वेटिंगचे आरक्षण 500 च्या वर पोहचलं आहे. त्यामुळे या गाड्यांचे तिकीट रिग्रेट दाखवत आहे.

29 सप्टेंबरपासून कोकण रेल्वेच्या आरक्षणाला सुरुवात झाली. 2 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होत असलं, तरी यावर्षीदेखील कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसमोर कोकण रेल्वेत आरक्षित जागा मिळणं अवघड आहे. मात्र जादा गाड्या सोडून चाकरमान्यांचे विघ्न दूर केलं जाईल, असा विश्वास कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.