Jaan Kumar Sanu |‘मी खुश नव्हतो…’, राहुल वैद्यच्या ‘नेपोटिझम’ कमेंटवर कुमार सानूची प्रतिक्रिया!

| Updated on: Nov 01, 2020 | 12:46 PM

जानला बिग बॉसच्या घरात नव्हे, तर इतर कुठल्याही गोष्टीत मी मदत केलेली नाही. ‘बिग बॉस’च्या घरात जाणे हे त्याचे स्वप्न होते.

Jaan Kumar Sanu |‘मी खुश नव्हतो...’, राहुल वैद्यच्या ‘नेपोटिझम’ कमेंटवर कुमार सानूची प्रतिक्रिया!
Follow us on

मुंबई : ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात सध्या जान कुमार सानू प्रकरण चांगलेच गाजते आहे. या आधी गायक जान कुमार सानूच्या या घरात असण्यावर प्रतिस्पर्धी राहुल वैद्यने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. गायक राहुल वैद्यने (Rahul Vaidya) जान कुमार सानूवर नेपोटिझमचा आरोप लावला होता. केवळ वडिलांच्या कृपेने जान या घरात असल्याचे त्याने म्हटले होते. यावर आता स्वतः कुमार सानू (Kumar Sanu) यांनी उत्तर दिले आहे. ‘त्याच्या बिग बॉसच्या घरात जाण्याने मी कधीच खुश नव्हतो’, असे कुमार सानू म्हणाले.(Kumar Sanu reacted on Rahul Vaidya’s Nepotism Comment on jaan kumar Sanu)

जानला बिग बॉसच्या घरात नव्हे, तर इतर कुठल्याही गोष्टीत मी मदत केलेली नाही. ‘बिग बॉस’च्या घरात जाणे हे त्याचे स्वप्न होते. त्याचे हे स्वप्न त्याने स्वतःच्या मेहनतीने पूर्ण केलेले आहे. यात माझे कसलेही योगदान नाही’, असे कुमार सानू म्हणाले.

मी खुश नव्हतो…

प्रसिद्ध गायक आणि जानचे वडील कुमार सानू यांनी एका वेब साईटला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान, राहुल वैद्यच्या नेपोटिझम कमेंटवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जान नेहमी सगळ्यांची मदत करतो. पण, जेव्हा तो बिग बॉसच्या घरात जाणार हे मला कळले तेव्हा मी खुश नव्हतो. बिग बॉसच्या घरात प्रचंड प्रेशर असते. तिथे नेहमीचे आयुष्य जगता येत नाही. या सगळ्यासाठी जान अजून लहान आहे. बिग बॉसच्या घरात जाण्याबद्दल जेव्हा त्याने मला विचारले, तेव्हा मी त्याला नकार दिला. परंतु, तो या कार्यक्रमाचा चाहता असल्याने त्याचा हट्ट होता. त्याने स्वतःच्या मेहनतीने या घरात प्रवेश केला आहे. मी त्याला मदत केलेली नाही’, असे कुमार सानू म्हणाले.(Kumar Sanu reacted on Rahul Vaidya’s Nepotism Comment on jaan kumar Sanu)

राहुल वैद्यची जान सानूवर टीका

‘बिग बॉस’च्या घरात नुकतीच नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यात प्रत्येक सदस्याला एका स्पर्धकाचे नाव नॉमिनेट करायचे होते. या टास्कमध्ये राहुल वैद्यने जान कुमार सानूचे नाव घेतले. याचे कारण देताना तो म्हणाला की, इथे सगळे स्पर्धक आपल्या कर्तृत्वाने आले आहेत. मात्र, जान कुमार सानू हा त्याच्या वडिलांच्या म्हणजेच प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा वरदहस्त असल्याने इथे आला आहे. राहुलच्या या वक्तव्यानंतर घरातील इतर स्पर्धकांनी राहुलला विरोध करण्यास सुरुवात केली. तर, जाननेही, मी कुमार सानू यांचा मुलगा असल्याचा गर्व आहे, असे म्हणत राहुलला टोला लगावला होता.

(Kumar Sanu reacted on Rahul Vaidya’s Nepotism Comment on jaan kumar Sanu)