Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नेपोटिझमचे वादळ, राहुल वैद्य-जान कुमार सानूमध्ये खडाजंगी!

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधला घराणेशाही वाद अर्थात नेपोटीझमचा मुद्दा समोर आला.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस’च्या घरात नेपोटिझमचे वादळ, राहुल वैद्य-जान कुमार सानूमध्ये खडाजंगी!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधला घराणेशाही वाद अर्थात नेपोटिझमचा मुद्दा समोर आला. या वादाचा फटका अनेक कलाकारांसह त्यांच्या चित्रपटांनादेखील बसला. हा वाद सुरू असतानाच आता ‘बिग बॉस 14’च्या घरात ही नेपोटिझम वाद सुरू झाला आहे. गायक राहुल वैद्यने (Rahul Vaidya) जान कुमार सानूवर (Jaan Sanu) नेपोटिझमचा आरोप लावला आहे.(Nepotism argument between Rahul Vaidya And Jaan kumar Sanu at Bigg Boss house)

‘बिग बॉस’च्या घरात नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. यात प्रत्येक सदस्याला एका स्पर्धकाचे नाव नॉमिनेट करायचे होते. या टास्कमध्ये राहुल वैद्यने जान कुमार सानूचे नाव घेतले. याचे कारण देताना तो म्हणाला की, इथे सगळे स्पर्धक आपल्या कर्तृत्वाने आले आहेत. मात्र, जान कुमार सानू हा त्याच्या वडिलांच्या म्हणजेच प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा वरदहस्त असल्याने इथे आला आहे. राहुलच्या या वक्तव्यानंतर घरातील इतर स्पर्धकांनी राहुलला विरोध करण्यास सुरुवात केली. तर, जाननेही, मी कुमार सानू यांचा मुलगा असल्याचा गर्व आहे, असे म्हणत राहुलला टोला लगावला.

इंडियन आयडॉलचा स्पर्धक राहुल वैद्य

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वात राहुल वैद्य स्पर्धक होता. या पर्वाचा तो उपविजेता ठरला होता. त्याचे वडील इंजिनीअर असून, ते नोकरी करतात. तर, राहुल स्वतः अनेक स्टेज शो करतो. जगभरात त्याच्या कार्यक्रमांचे आयोजन होत असते. प्रसिद्ध संगीतकार जोडी साजिद-वाजिद यांच्या पहिल्या अल्बमसाठी राहुलने संगीत दिले होते. (Nepotism argument between Rahul Vaidya And Jaan kumar Sanu at Bigg Boss house)

या उलट जान कुमार सानूने आतापर्यंत केवळ तीन ते चार गाणी गायली आहेत. या गाण्यांनाही हवी तशी प्रसिद्धी मिळालेली नाही. ‘बिग बॉस’च्या सुरुवातीच्या भागात जानने तो बिग बॉसचा फॅन असल्याचे म्हटले होते. परंतु केवळ इतकीच गोष्ट त्याच्या घरात येण्यासाठी गरजेची आहे का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जान व्यतिरिक्त इतर स्पर्धक सेलिब्रिटी आहेत. मात्र जानकडे कुठल्याही प्रकारचे फेम नसताना त्याला या कार्यक्रमात का घेण्यात आले, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

सामान्य गायकाला इतकी मोठी संधी मिळेल का?

सोशल मीडियावर असे अनेक लोक आहेत, जे जान पेक्षा अधिक प्रसिद्ध आहेत. मात्र, जान ऐवजी त्यांना संधी दिली गेली असती का?, असे विचारले जाते आहे. तर, कमी व्होट्स असताना देखील जानला खेळत टिकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही केला जात आहे.

(Nepotism argument between Rahul Vaidya And Jaan kumar Sanu at Bigg Boss house)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *