AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेतून कुंडलिक खाडे यांची हकालपट्टी, क्लीप व्हायरल झाल्याने झाली कारवाई

धनंजय मुंडे यांनी देखील कुंडलिक खांडे यांच्यावर टिका केली होती. दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.

शिवसेनेतून कुंडलिक खाडे यांची हकालपट्टी, क्लीप व्हायरल झाल्याने झाली कारवाई
kundlik khadeImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jun 29, 2024 | 4:30 PM
Share

पक्ष विरोधी कारवाई केल्याचा फटका शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना अखेर बसला आहे. त्याची हक्कालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेना सचिव संजय मोरे यांनी म्हटले आहे. कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते शिवराज बांगर यांच्यातील संवादाची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बीडमध्ये भाजपाच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. महाराष्ट्रात लोकसभेला कमी जागा मिळाल्यानंतर महायुतीत घटक पक्षांमध्ये कोणी काम केले कोणी मदत केली नाही याची झाडाझडती सुरु असून आरोपप्रत्यारोप होत आहेत. त्यात ही कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित गटाने नेते मंत्री धनंजय मुंडे यांनी टीका केली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातील शिवसेनेचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची एक ऑडिओ क्लिप दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये कुंडलिक खांडे यांनी एक धक्कादायक वक्तव्य केले होते. आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडे यांना धोका दिल्याचे या ऑडीओ क्लीपमध्ये कुंडलिक खांडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे महायुतीत मोठं वादळ निर्माण झाले आहे. बीड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे निवडून आले आहेत. पंकजा मुंडे यांचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाच्या फटका या ठिकाणी बसला असल्याचे म्हटले जात आहे. धनंजय मुंडे यांनी देखील कुंडलिक खांडे यांच्यावर टिका केली होती. दोन दिवसांपूर्वी कुंडलिक खांडे यांची कथित ऑडीओ क्लीप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे.

कार्यलयाची झाली होती तोडफोड

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिवराज बांगर आणि शिंदे गटाचे कुंडलिक खांडे यांच्या दरम्यान झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. ही क्लिप लोकसभा निवडणुकीच्या काळातील असल्याचे म्हटले जात होते.  या क्लिपमध्ये शिंदे गटाचे कुंडलिक खांडे हे मी पहिल्यांदाच पंकजा मुंडेंना धोका दिला, असं म्हणत असल्याचं ऐकू येत आहे. आपण 376 बुथवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केली, असं कुंडलिक खांडे म्हणाले होते. कुंडलिक खांडे हे शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांच्या आता कारवाई केली आहे. या संदर्भात शिवसेना सचिव संजय मोरे यांनी पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. संबधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक  झाले होते. बीड शहरातील जालना रोडवर असलेले खांडे यांचे कार्यालय जमावाने  दगडफेक करुन तोडले होते.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता