गृहमंत्री अमित शाह अटल बिहारी वाजपेयींच्या बंगल्यात राहणार

| Updated on: Jun 06, 2019 | 8:40 PM

अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाची टर्म संपल्यापासून ते अखेरपर्यंत याच बंगल्यात राहत होते. निधनानंतर याच बंगल्यात अनेक नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली दिली होती. अमित शाह सध्या 11 अकबर रोडच्या सरकारी निवासस्थानामध्ये राहतात.

गृहमंत्री अमित शाह अटल बिहारी वाजपेयींच्या बंगल्यात राहणार
Follow us on

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बंगल्यात राहणार आहेत. 6-ए कृष्ण मेनन मार्ग हे अमित शाहांचं नवं निवासस्थान असेल. लोकसभेच्या आवास समितीने हा बंगला अमित शाहांना दिलाय. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधानपदाची टर्म संपल्यापासून ते अखेरपर्यंत याच बंगल्यात राहत होते. निधनानंतर याच बंगल्यात अनेक नेत्यांनी वाजपेयींना श्रद्धांजली दिली होती. अमित शाह सध्या 11 अकबर रोडच्या सरकारी निवासस्थानामध्ये राहतात.

मोदी सरकारमध्ये अमित शाह यांना गृहमंत्रीपद देण्यात आलंय. सरकारचे धोरणात्मक निर्णय घेणाऱ्या समित्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. अमित शाह सर्व 8 कॅबिनेट समित्यांचे सदस्य आहेत. आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या Cabinet Committee on Investment आणि Cabinet Committee on Employment & Skill Development मध्येही अमित शाहांना स्थान देण्यात आलंय.

परंपरेनुसार अमित शाहांना संसदीय अधिवेशनाची तारीख आणि इतर गोष्टी निश्चित करणाऱ्या Cabinet Committee on Parliamentary Affairs चं अध्यक्षपदही देण्यात आलंय. शिवाय सरकारमध्ये वरिष्ठ पदांच्या नियुक्तीबाबत निर्णय घेणाऱ्या Cabinet Committee on Appointments चंही सदस्य बनवण्यात आलंय.

अमित शाहांनी गृहमंत्रीपद सांभाळताच काश्मीरप्रश्नी काम सुरु केलंय. दहा दहशतवाद्यांची यादीही जारी करण्यात आली आहे. शिवाय अमित शाहांनी जम्मू काश्मीरच्या राज्यपालांशीही चर्चा केली. जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच हिंदू मुख्यमंत्री बसवण्यासाठी भाजपकडून हालचाली होत असल्याची माहिती आहे. यासाठी विधानसभा मतदारसंघांची पुन्हा एकदा सीमा निश्चिती केली जाऊ शकते.