सलग तिसऱ्या दिवशी डिझेल दरवाढ, पेट्रोलच्या किमतीत किती वाढ?

| Updated on: Dec 22, 2019 | 8:33 AM

सलग तिसऱ्या दिवशी डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलच्या किमतीत 20 पैशांची वाढ झाली आहे (Latest Petrol Diesel Price hike). मागील 3 दिवसांमध्ये डिझेलच्या किमतीत 50 पैशांची वाढ झाली आहे.

सलग तिसऱ्या दिवशी डिझेल दरवाढ, पेट्रोलच्या किमतीत किती वाढ?
Follow us on

नवी दिल्ली : सलग तिसऱ्या दिवशी डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलच्या किमतीत 20 पैशांची वाढ झाली आहे (Latest Petrol Diesel Price hike). मागील 3 दिवसांमध्ये डिझेलच्या किमतीत 50 पैशांची वाढ झाली आहे. दुसरीकडे पेट्रोलच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार शनिवारी (21 डिसेंबर 2019) दिल्ली, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर अनुक्रमे 74.63 रुपये, 80.29 रुपये, 77.29 रुपये आणि 77.58 रुपये प्रति लिटर आहेत. डिझेलचे दर अनुक्रमे (Diesel Price Today) 66.54 रुपये, 69.80 रुपये, 68.95 रुपये आणि 70.34 रुपये प्रति लिटर आहेत (Latest Petrol Diesel Price hike).

दररोज सकाळी 6 वाजता इंधरदरात बदल

पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज वाढ किंवा घट पाहायला मिळते. पेट्रोल-डिझेलचे नवे दर दररोज सकाळी 6 वाजता लागू होतात. इंधनाच्या दरात एक्साईज ड्यूटी, डिलर कमीशन अशा अनेक गोष्टी जोडून हे दर जवळपास दुप्पट होतात.

घरच्या घरी SMS ने आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर पाहा

जर तुम्हाला सकाळी 6 वाजल्यानंतर बदल झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती हवी असेल तर 92249 92249 नंबरवर SMS पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला RSP<स्पेस>पेट्रोल पंप डिलरचा कोड लिहून 92249 92249 या नंबरवर पाठवावा लागेल. उदाहरणार्थ तुम्ही दिल्लीत असाल तर RSP 102072 लिहून 92249 92249 वर पाठवावा लागेल. इतर शहरांसाठी केवळ पेट्रोल पंप डिलरचा कोड बदलेल.