ऑक्सिजन लावण्यास सांगितल्याने आरोग्य सेवकाची मारहाण, लातूरमध्ये कोरोनाग्रस्त महिलेची तक्रार

| Updated on: Aug 10, 2020 | 9:32 AM

श्वासोच्छवास घ्यायला त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन लावण्याची मागणी करण्यावरुन आरोग्य सेवकाने मारहाण केल्याचा आरोप वृद्धेने केला आहे

ऑक्सिजन लावण्यास सांगितल्याने आरोग्य सेवकाची मारहाण, लातूरमध्ये कोरोनाग्रस्त महिलेची तक्रार
Follow us on

लातूर : लातूरमध्ये कोरोनाग्रस्त महिलेला आरोग्य सेवकाने मारहाण केल्याचा आरोप आहे. ऑक्सिजन लावण्याची मागणीवरुन वाद झाल्याने तोंडावर मारल्याचा दावा वृद्धेने केला आहे. (Latur Corona Positive Old Lady allegedly beaten up by Hospital Staff)

लातूरच्या शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तक्रारदार कोरोना पॉझिटिव्ह महिला अ‍ॅडमिट होती. तिच्या मुलाने फोन केल्यानंतर वृद्ध महिलेने आपल्याला नाईट ड्युटीवर असलेल्या हॉस्पिटलमधील आरोग्य सेवकाने मारहाण केल्याचं तिने सांगितलं.

श्वासोच्छवास घ्यायला त्रास होऊ लागल्याने या महिलेने ऑक्सिजन लावण्याची मागणी केली होती. यावरुन संबंधित आरोग्य सेवक व्यक्तीसोबत वाद झाला. त्यानंतर त्याने चेहऱ्यावर मारहाण केल्याचं रुग्ण महिलेचं म्हणणे आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

सध्या या महिलेवर सोलापूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्ण महिलेच्या मुलाच्या तक्रारीवरुन आता या घटनेची सत्यता तपासण्याच्या सूचना हॉस्पिटलच्या अधिष्ठात्यांनी दिल्या आहेत.

बीडमध्ये व्हेंटिलेटर बंद पडून मृत्यू

कोरोना कक्षातील रुग्णांबाबत हलगर्जी आणि असंवेदनशीलतेच्या तक्रारी याआधीही आल्या आहेत. कोरोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे बीडमधील रुग्णांची दहा दिवसांपूर्वी मोठी तारांबळ उडाली होती. व्हेंटिलेटर बंद पडल्याने वृद्ध रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जुलै महिन्याच्या अखेरीस समोर आली होती.

रुग्ण तडफडत असताना काय करावं हे डॉक्टरांनाही समजत नव्हतं. रुग्णाच्या नातेवाईकांनीच धावपळ करत कक्षातीलच ऑक्सिजन लावण्याचा प्रयत्न केला, असे व्हिडिओत दिसत होते.

संबंधित बातम्या :

वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद, बीडमध्ये कोरोना कक्षात रुग्णाचा तडफडून मृत्यू

(Latur Corona Positive Old Lady allegedly beaten up by Hospital Staff)