
लिसा हेडन काही दिवसांपूर्वीच एका मुलीची आई झाली. तिनं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. आता लिसानं मुलीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

आता लिसानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती स्तनपान करताना दिसतेय. हे फोटो आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

या दरम्यान लिसा असेही म्हणाली की ती बऱ्याच काळापासून सोशल मीडियापासून दूर होती, मात्र आता ती या फोटोंद्वारे पुनरागमन करत आहे.

लिसाने तिच्या मुलीचं नाव लारा ठेवलं आहे आणि तिनं लाराच्या वतीने सर्वांना खूप प्रेम दिले आहे.

लिसाच्या प्रोफेशनल लाइफबद्दल बोलायचं झालं तर ती आतापर्यंत आयेशा, क्वीन, द शॉकिन्स, हाऊसफुल 3 आणि ए दिल है मुश्किल मध्ये दिसली आहे.