सरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप

| Updated on: Oct 27, 2020 | 11:26 PM

पनवेल तालुक्यातल्या वाकडेवाडी येथे आदिवासींना वाटप करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या तांदळात अळ्या सापडल्याचे निदर्शनास आले. | PDS distrubution

सरकारकडून आदिवासींची क्रूर चेष्टा, अळ्या पडलेल्या आणि सडक्या तांदळाचे वाटप
Follow us on

पनवेल: एरवी दुर्गम भागात राहत असल्यामुळे विकासापासून कायम वंचित राहणाऱ्या आदिवासी बांधवांची कोरोनाच्या संकट काळातही शासनाकडून अक्षम्य उपेक्षा होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पनवेल तालुक्यातल्या वाकडेवाडी येथे आदिवासींना वाटप करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या तांदळात अळ्या सापडल्याचे निदर्शनास आले. हे तांदूळ सडलेलेही होते. विशेष म्हणजे आदिवासी विकास महामंडळाकडूनच हा धान्याचा साठा पाठवण्यात आला होता. या वाहनावर ‘महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग खावटी वितरण योजना 2020-21’ असे लिहिलेले आढळले. (Low quality foodgrains distrubuted to tribals in Maharashtra)

आदिवासी कातकरी या आदिम जमातीच्या कुटुंबांना वाटप करण्यासाठी 5200 किलो तांदूळ वाकडी येथील अनुदानित आश्रम शाळेत आणला होता. मात्र, संपूर्ण तांदळाचा साठा खराब असल्याचे लक्षात आल्यानंतर श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित ट्रक शासकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिला.

पनवेलमध्ये वाटप करण्यासाठी आणलेल्या तांदळाचा पंचनामा करण्यासाठी वाकडी पाडा येथील तलाठी, पोलीस, आदिवासी विकास विभागाचे श्रमजीवी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष हिरामण भाऊ नाईक, हिराताई पवार, बाळू वाघे, भगवान वाघमारे,कुंदा पवार व इतर कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. पकडण्यात आलेला तांदूळ तपसणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती श्रमजीवी संघटनेचे रायगड जिल्हाध्यक्ष हिरामण नाईक यांनी दिली.

इतर बातम्या:

वर्ध्यात सामाजिक संस्था अन्न-धान्य घेऊन घरो-घरी पोहोचल्या, मात्र विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित असल्याची ओरड

26 वर्षीय इंजिनीअरचा भन्नाट प्रयोग, मुंबईतील नोकरी सोडून दापोलीत काळा तांदूळ पिकवला

तांदूळ घेऊन आलेले ट्रकचालक उपाशी, नवी मुंबईत भुकेले ट्रकचालक मेटाकुटीला

(Low quality foodgrains distrubuted to tribals in Maharashtra)