Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन उभारणार

| Updated on: Mar 06, 2020 | 12:43 PM

राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी विशेष (Women Police Station) घोषणा केली.

Maharashtra Budget 2020 : अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठी घोषणा, प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्टेशन उभारणार
Follow us on

मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी विशेष (Women Police Station) घोषणा केली. राज्यात दिवसेंदिवस महिला अत्याचारात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र असे पोलीस स्थानक उभे करणार असल्याची घोषणा केली. तसेच प्रत्येक जिल्ह्यात महिला आयोगाचे कार्यालयही स्थापन करणार असल्याचे त्यांनी (Women Police Station) म्हटले.

महिलांच्या सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस स्थानक स्थापन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पोलीस स्टेशनमध्ये सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी महिला असतील. जिल्ह्यातील पीडित महिला येथे निर्भयपणे तक्रार दाखल करु शकतील.

याशिवाय महिला बालविकास विभागासाठी 2 हजार 110 कोटींची तरतूदही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यासोबतच महिला बचत गटाच्या चळवळी सुरु करण्यात येणार आहे. किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपब्लध करुन देण्यात येईल, असंही अजित पवार यांनी सांगितले.

महिला

  • महिला बालविकास विभागासाठी 2 हजार 110 कोटी : अजित पवार
  • प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस ठाणे, महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध
  • फक्त महिलाच अधिकारी, कर्मचारी असलेले महिला पोलीस ठाणे प्रत्येक जिल्हा मुख्यालयात स्थापन करण्यात येणार,
  • जिल्ह्यातील पीडित महिला येथे निर्भयपणे तक्रार दाखल करू शकतील.
  • महिला बचत गटाच्या चळवळी सुरु करु.
  • किशोरवयीन मुलींसाठी सॅनिटरी नॅपकीन उपब्लध करून देण्यात येईल
  • पहिल्या महिला धोरणाला 25 वर्षे पूर्ण, त्यानिमित्त कवी केशव खटिंग यांच्या कवितेच्या ओळी अजित पवारांकडून सादर

माय झाली सरपंच, दोरी झेंड्याची ओढिते
सावित्रीच्या रांगोळीचा एक ठिपका जोडिते