राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांवर, 4 लाखांपेक्षा जास्त बाधितांना डिस्चार्ज

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आता 70.9 टक्क्यांवर पोहोचलं आहे (Maharashtra Corona Update).

राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण 70 टक्क्यांवर, 4 लाखांपेक्षा जास्त बाधितांना डिस्चार्ज
| Updated on: Aug 17, 2020 | 8:52 PM

मुंबई : राज्यात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचं प्रमाण आता 70.9 टक्क्यांवर पोहोचलं आहे (Maharashtra Corona Update). विशेष म्हणजे आज (17 ऑगस्ट) दिवसभरात 11 हजार 391 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात आतापर्यंत 4 लाख 28 हजार 514 रुग्ण बरे झाले आहेत.

राज्यात आज दिवसभरात 8 हजार 493 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 4 हजार 358 वर पोहोचला आहे. यापैकी 1 लाख 55 हजार 258 रुग्ण सक्रिय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत (Maharashtra Corona Update).

राज्यात आज दिवसभरात 228 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर हा 3.35 टक्के एवढा आहे. तर राज्यात आतापर्यंत 20 हजार 265 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात 10 लाख 53 हजार 659 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 32 लाख 06 हजार 248 नमुन्यांपैकी 6 लाख 04 हजार 358 नमुने पॉझिटिव्ह (18.8 टक्के) आले आहेत. राज्यात 10 लाख 53 हजार 659 नागरिक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 37 हजार 556 नागरिक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पुण्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण

राज्यात सुरुवातीला मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळले होते. मात्र, मुंबईतील परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. मुंबईत 1 लाख 29 हजार 479 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 1 लाख 04 हजार 301 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 7 हजार 173 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 17 हजार 704 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

दुसरीकडे पुण्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 32 हजार 481 रुग्ण आढळले आहेत. यापैरी 89 हजार 810 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 3 हजार 247 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 39 हजार 424 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.