Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, रुग्णांचा आकडा 19 हजारांच्या पार

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 19 हजार 063 वर पोहोचली आहे. आज (8 मे) दिवसभरात 1 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, रुग्णांचा आकडा 19 हजारांच्या पार

मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस आणखी घट्ट (Maharashtra Corona Virus Cases Update) होत चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. तरीही राज्यातील कोरोनाचं संकट अद्याप नियंत्रणात आलेलं नाही. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 19 हजार 063 वर पोहोचली आहे. आज (8 मे) दिवसभरात 1 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात आज 169 कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे झाले असून त्यांना घरी (Maharashtra Corona Virus Cases Update) सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यभरात 3,470 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

दिवसभरात 37 कोरोनाबाधितांचा मृत्यू

आज राज्यात 37 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळीची एकूण संख्या 731 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई मधील 25, पुण्यातील 10, जळगावमधील 1 आणि अमरावती शहरातील एकाचा समावेश आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरुष तर 18 महिला आहेत. आज झालेल्या 37 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 17 रुग्ण आहेत. तर 16 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. 37 रुग्णांपैकी 27 जणांमध्ये (73 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 731 झाली आहे.

राज्यात 2 लाख 39 हजार 531 जण होम क्वारंटाईन

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 2 लाख 12 हजार 350 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 197 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 19 हजार 063 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 2 लाख 39 हजार 531 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 494 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Maharashtra Corona Virus Cases) आहेत.

राज्यात 52.64 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1139 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 13 हजार 552 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 52. लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

कोरोनाची अद्ययावत आकडेवारी :

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Corona Virus Cases Update

संबंधित बातम्या :

CM Uddhav Thackeray Live | 17 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे, पुढे काय होणार?, मुख्यमंत्री म्हणतात…

Pune Lockdown | पुणे छावणी परिसर 2 दिवस पूर्ण लॉकडाऊन, मेडिकल वगळता सर्व बंद

Navi Mumbai Corona | APMC मार्केट 11 ते 17 मेदरम्यान पूर्ण बंद, पाचही मार्केट बंद राहणार

अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना, बाधित पोलिसांची संख्या 618 वर

Published On - 10:10 pm, Fri, 8 May 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI