राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’, मेल आणि व्हॉटसअ‍ॅपद्वारे काम करणार

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम दिले जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला (Maharashtra Government employee work from home) आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, मेल आणि व्हॉटसअ‍ॅपद्वारे काम करणार
नोकरी बदलल्यास आता पीएफप्रमाणे ग्रॅज्युएटीही होणार ट्रान्सफर
| Edited By: | Updated on: Jun 06, 2020 | 6:07 PM

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्व (Maharashtra Government employee work from home) खासगी कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहे. त्यानतंर आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वर्क फ्रॉम होम दिले जाणार आहे. नुकतंच याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

या शासन निर्णयानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून काम करणार आहे. त्याशिवाय एखाद्या प्रस्तावही मेलवर तयार करुन वरिष्ठांना पाठवला जाणार आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत राज्य सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती नियंत्रित करण्यात येत आहे. तसेच भविष्यातही अशा प्रकारची परिस्थिती लक्षात घेता शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या घरातच राहून कामकाज करावे लागणार आहे. यासाठी शासकीय ईमेल, त्यांच्या नेहमीच्या वापरातील अन्य ईमेल, तसेच व्हॉट्सअॅपचा वापर संबंधितांना सूचना देण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.

त्यासाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचे शासकीय ईमेल आयडी, व्हॉट्सअ‍ॅपवरील मोबाईल क्रमांक कार्यालयास उपलब्ध करुन द्यावा. ईमेल आणि व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त काम करावे. एखादा प्रस्ताव ईमेलद्वारे फॉरवर्ड केल्यानंतर त्याची सूचना लगेचच व्हॉट्सअ‍ॅपवरुन देण्याची दक्षता घ्यावी, अशा काही सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. या सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार (Maharashtra Government employee work from home) आहेत.

संबंधित बातम्या : 

Maharashtra Corona Update | राज्यात दिवसभरात 2,436 नवे रुग्ण, आतापर्यंत 35,156 रुग्ण कोरोनामुक्त

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या सर्व परीक्षा घेण्यास राज्यपालांची मंजुरी