नाशिकमध्ये लवकरच मेट्रो धावणार

आता नाशिक शहरातही लवकरच मेट्रो ट्रेन (Metro Train) धावणार आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रणाली विकसित करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यास काल (28 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

नाशिकमध्ये लवकरच मेट्रो धावणार
Follow us
| Updated on: Aug 29, 2019 | 8:24 AM

नाशिक : आता नाशिक शहरातही लवकरच मेट्रो ट्रेन (Metro Train) धावणार आहे. नाशिकमध्ये सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रणाली विकसित करण्यासाठी मेट्रो प्रकल्प राबविण्यास काल (28 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये 33 किलोमीटर लांबीची मुख्य मार्गिका आणि 26 किलोमीटरच्या पूरक मार्गिकांचा समावेश असेल. वीज आणि बॅटरी या दोन्ही ऊर्जास्रोतांचा वापर या प्रकल्पात होत असल्याने तो देशात अभिनव ठरणार आहे.

नाशिक हे राज्यातील वेगाने विकसित होणारे शहर आहे. नाशिक महानगरातील गावेही झपाट्याने वाढत आहेत. नाशिक शहर आणि आसपासच्या प्रदेशाची गरज लक्षात घेता राज्य शासनाने अत्याधुनिक सार्वजनिक परिवहन प्रणालीच्या (MRTS – Mass Rapid Transit System) स्वरुपात परवडणारी, प्रदूषणमुक्त, हरित, ऊर्जा प्रेरक आणि विश्वसनीय अशी सार्वजनिक परिवहन प्रणाली निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकच्या सर्वसमावेशक वाहतूक आणि परिवहन आराखड्या आधारे तसेच शहरातील अरुंद, दाटीवाटीच्या रस्त्यांची गरज लक्षात घेऊन मेट्रो सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कसा असेल मार्ग?

दोन मुख्य मार्गिकांवर वीज आधारित मेट्रो यान चालवण्यात येतील. यामध्ये गंगापूर ते नाशिक रोड रेल्वे स्थानक ही मुख्य उन्नत मार्गिका क्रमांक 1 असेल. या मार्गाची लांबी 22.5 किमी राहणार असून त्यामध्ये 20 स्थानके असतील. तर गंगापूर ते मुंबई नाका ही मुख्य उन्नत मार्गिका क्रमांक 2 राहणार असून त्याची लांबी 10.5 किमी असेल व त्यात 10 स्थानके असतील.

या दोन मुख्य मार्ग‍िकांची क्षमता वाढविण्यासाठी मुंबई नाका ते सातपूर कॉलनी असा 11.5 किमी आणि नाशिक स्थानक-नांदुरनाका मार्गे शिवाजीनगर असा 14.5 किमी असा एकूण 26 किमीचा पूरक मेट्रो मार्ग बांधण्यात येणार आहे. या पूरक रस्त्यांवर बॅटरीवर धावणारे मेट्रो यान चालविण्यात येतील. पूरक मार्गांमुळे मुख्‍य मेट्रो मार्गांवर पोहोचणे नागरिकांना सुलभ होईल. या संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे 2100 कोटी इतका आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.