LIVE : मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ अब्दुल रेहमान स्ट्रीट इमारतीला आग, चार दुकांनं जळून खाक

महाराष्ट्र आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड आणि अपडेटेड बातम्या फक्त एका क्लिकवर

LIVE : मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ अब्दुल रेहमान स्ट्रीट इमारतीला आग, चार दुकांनं जळून खाक


[svt-event title=”मुंबईत क्रॉफर्ड मार्केटजवळ अब्दुल रेहमान स्ट्रीट इमारतीला आग, चार दुकांनं जळून खाक” date=”09/11/2020,12:44PM” class=”svt-cd-green” ] मुंबई : अब्दुल रेहमान स्ट्रीट इथे एल टू लेवलची आग, चौथ्या मजल्यावर लागली आग, 31, 32 अब्दुल रेहमान स्ट्रीट इमारतीला आग, पहाटे पाच वाजता लागली होती आग, मेडिसान, स्टॉकची चार दुकांनं जळून खाक, आगीवर नियंत्रण मिळवण्यात फायर ब्रिगेडला यश, फायर ब्रिगेडकडून कुलिंग ऑपरेशन सुरु, कोणतीही जिवीतहानी नसल्याची माहिती [/svt-event]

[svt-event title=”उस्मानाबादेत एसटी कामगार संघटनाचे आक्रोश आंदोलन, दैनंदिन खर्च भागविणे अवघड झाल्याने कर्मचारी संतप्त” date=”09/11/2020,11:10AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद : एसटी कामगार संघटनाचे आक्रोश आंदोलन, उस्मानाबाद येथे सहकुटुंब एसटी कामगार सहभागी, गेल्या 3 महिन्यापासुन पगार न झाल्याने उपसमारीची समस्या, दैनंदिन अडचण आणि खर्च भागविणे अवघड झाल्याने कर्मचारी संतप्त [/svt-event]

[svt-event title=”कुटुंबासह एसटी कामगारांचं राज्यभर आंदोलन, पुण्यात सरकार विरोधात घोषणाबाजी” date=”09/11/2020,11:06AM” class=”svt-cd-green” ] पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचे आज आक्रोश आंदोलन, पुण्यात आंदोलनाला सुरुवात, सरकार विरोधात घोषणाबाजी, गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कामगारांचे वेतन नाही, दिवाळी तोंडावर आली असताना सरकार दखल घेत नसल्यामुळे आंदोलन,आज राज्यभर कुटुंबासह कामगार आंदोलन करणार, पुण्यातील एसटी कॉलनी परिसरात आंदोलन [/svt-event]

[svt-event title=” कोल्हापुरात प्रेयसीसोबत पळून जावून लग्न करण्यासाठी प्रियकराने मारला मावशीच्याच दागिन्यांवर डल्ला” date=”09/11/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ] कोल्हापूर : प्रेयसीसोबत पळून जावून लग्न करण्यासाठी प्रियकराने मारला मावशीच्याच दागिन्यांवर डल्ला, कागल तालुक्यातील वंदूर इथली घटना, संशयित प्रियकर अरुण पवारला अटक, कागल पोलिसांनी अवघ्या काही तासात उघडकीस आणत सुमारे दोन लाखांचे दागिने केले हस्तगत, दागिने विकून मोटार सायकल खरेदी करत प्रेयसीला खुश करण्याचा होता पवारचा इरादा, मात्र त्या आधीच पोलिसांनी ठोकल्या बेड्या [/svt-event]

[svt-event title=”महापौरांच्या गाडीपासून ते कचरा संकलनाच्या गाडीपर्यंत सर्व वाहनं सीएनजीवर करा : नितीन गडकरी” date=”09/11/2020,7:49AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : ‘सहा महिन्यात नागपूर मनपाचे सर्व वाहनं सीएनजीवर करा’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या नागपूर महानगरपालिकेला सूचना, महापौरांच्या गाडीपासून ते कचरा संकलनाच्या गाडीपर्यंत सर्व वाहनं सीएनजीवर करा, सीएनजी फिलिंग सेंटर उभारण्याचाही सल्ला, पर्यावरणाचं हित आणि आर्थिक नियोजनासाठी गडकरींनी दिला सल्ला [/svt-event]

[svt-event title=”राष्ट्रीय सचिवपदी निवडीनंतरही पंकजा मुंडे महाराष्ट्रात दुर्लक्षितच” date=”09/11/2020,7:47AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : राष्ट्रीय सचिवपदी निवडीनंतरही पंकजा मुंडे महाराष्ट्रात दुर्लक्षितच, पंकजा मुंडे यांचे पंख छाटण्याचे काम सुरुच, पंकजा मुंडे यांना मराठवाड्यातील पक्ष बांधणी कर्यक्रमापासून ठेवले दूर, पंकजा मुंडे यांचा नियोजित औरंगाबाद आणि मराठवाडा दौरा रद्द, एकट्या चंद्रकांत पाटलांकडूनच मराठवाड्यात बैठक सुरुच, काल औरंगाबाद दौऱ्यात पंकजा मुंडे गैरहजर आज बीडच्या दौऱ्यातही उपस्थितीवर प्रश्नचिन्ह, भाजप पक्षातून पंकजा मुंडे यांना अजूनही महत्व नाहीच [/svt-event]

[svt-event title=”औरंगाबादेत गोळीबार करत व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न,” date=”09/11/2020,7:44AM” class=”svt-cd-green” ] औरंगाबाद : औरंगाबादेत गोळीबार करत व्यापाऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न, सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरातील घटना, कापड व्यावसायिक अखिलेश गुप्ता यांच्या अपहरणाचा प्रयत्न, गोळीबारात बालंबाल बचावले व्यापाऱ्यांचे प्राण, गोळीबारादरम्यान लोक जमा झाल्यामुळे फसला अपहरणाचा प्रयत्न [/svt-event]

[svt-event title=”नागपूर जिल्ह्यात पुन्हा घटली कोरोना चाचण्यांची संख्या, पण रुग्णसंख्या 11.15 टक्के वाढली” date=”09/11/2020,7:43AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपूर जिल्ह्यात पुन्हा घटली कोरोना चाचण्यांची संख्या, जिल्ह्यात काल दिवसभरात अवघ्या 2439 कोरोना चाचण्या, चाचण्या घटल्या पण रुग्णसंख्या 11.15 टक्के वाढली, जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 272 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, दिवाळीसाठी बाजारात गर्दी वाढल्याने कोरोना संक्रमणाचा जास्त धोका, नागपुरात आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”बीडमधील एलआयसी ऑफिसला भीषण आग, संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी” date=”09/11/2020,7:41AM” class=”svt-cd-green” ] बीड : एलआयसी ऑफिसला भीषण आग, संपूर्ण इमारत आगीच्या भक्ष्यस्थानी, पहाटेच्या सुमारास लागली आग, अग्निशामक दल घटनास्थळी दाखल, आगीत कोट्यावधीचं नुकसानीची शक्यता, नगररोडवरील घटना [/svt-event]

[svt-event title=”कुख्यात डॉन संतोष आंबेकर पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, व्यापाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी” date=”09/11/2020,7:26AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : कुख्यात डॉन संतोष आंबेकर पुन्हा पोलिसांच्या ताब्यात, व्यापाऱ्यांच्या फसवणूक प्रकरणी पाच दिवसांची पोलीस कोठडी, स्वस्तात सोनं देण्याच्या नावावर घातला होता 27 लाखांचा गंडा, विविध गुन्ह्यात संतोष आंबेकर आधीच होता नागपूर कारागृहात, गुन्हे शाखेनं आंबेकरला कारागृहातून घेतलं ताब्यात [/svt-event]

[svt-event title=”नागपुरात व्याजाचे आमिष दाखवून 35 कोटींची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल” date=”09/11/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ] नागपूर : नागपुरात व्याजाचे आमिष दाखवून 35 कोटींची फसवणूक, गुंतवणूकदारांचे 35 कोटी लुटून कंपनीचे संचालक पसार, एजीएम कॅार्पोरेशन डिजीटल ॲडव्हटाईजमेंट कंपनीने लावला अनेकांना गंडा, कंपनीच्या संचालकांविरुद्ध बर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, तीन आरोपींविरुद्ध बर्डी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, पोलीसांचा तपास सुरु [/svt-event]

[svt-event date=”09/11/2020,07:20AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI