परदेशासह मुंबई पुण्यातून येणाऱ्यांना गावात बंदी, बांबूने रस्ता अडवत खासगी वाहनं रोखली

| Updated on: Apr 06, 2020 | 7:58 AM

मुंबई पुण्यात रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्याला गेलेल्या (Yavatmal Village not allow mumbai pune people) नागरिकांचे लोंढेच्या लोंढे गावखेड्याकडे वळत आहे.

परदेशासह मुंबई पुण्यातून येणाऱ्यांना गावात बंदी, बांबूने रस्ता अडवत खासगी वाहनं रोखली
Follow us on

यवतमाळ : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशपातळीवर बंदी घातली गेली (Yavatmal Village not allow mumbai pune people) आहे. त्यानंतर आता परदेशासह मुंबई पुण्यातून येणाऱ्यांना गावपातळीवर बंदी घातली आहे. गावकऱ्यांसह गाव सुरक्षित राहिले पाहिजे, हा या मागचा मूळ उद्देश आहे.

मुंबई पुण्यात रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्याला गेलेल्या (Yavatmal Village not allow mumbai pune people) नागरिकांचे लोंढेच्या लोंढे गावखेड्याकडे वळत आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या बसफेऱ्या रोखल्या आहेत. मात्र तरीही बाहेरील व्यक्ती खासगी वाहनांच्या मदतीने गावात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचा आकडा वाढत आहे. यामुळे गावकरी चांगलेच धास्तावले आहेत.

परदेशातून किंवा मुंबई पुण्यातून आलेल्या व्यक्तींमुळे कोरोना विषाणू मोठ्या प्रमाणात पसरतो, असा समज गावकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. बाहेरुन येणारा कोणता व्यक्ती कोरोना विषाणू बाधित असेल हे कोणालाही सांगता येत नाही. कोरोनाची बाधा झालेला व्यक्ती 14 दिवसानंतरच लक्षणे दाखवतो. तोपर्यंत अनेकांना त्याची बाधा होते. हा प्रकार थांबविण्यासाठी गावकऱ्यांनी बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

यवतमाळमधील जामडोह गावात नागरिकांनी अशाचप्रकारे बाहेर ठिकाणावरुन येणाऱ्या व्यक्तींना प्रवेशबंदी केली आहे. कोरोनाची बाधा रोखण्यासाठी हा निर्णय या गावातील व्यक्तींनी घेतला आहे. जामडोहमध्ये मुख्य रस्त्यावर दोर बांधून बाहेर ठिकाणावरून येणारी वाहने थांबवण्यात येत आहे. कोणत्याही खासगी वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. रस्त्यावर तशा स्वरूपाचा संदेशही लिहिण्यात आला आहे. यामुळे गावाबाहेर पडलेल्या आणि परजिल्ह्यात वास्तव्याला असणाऱ्या व्यक्तींना गावांमध्ये प्रवेश करताना गावकऱ्याची खात्री झाल्यानंतरच गावात प्रवेश मिळत (Yavatmal Village not allow mumbai pune people) आहे.