महाराष्ट्र पोलिसांचा चीनमध्ये स्वातंत्र्य दिन

| Updated on: Aug 16, 2019 | 10:20 AM

शात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना, तिकडे परदेशातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांनी चीनमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करुन देशप्रेमाची प्रचिती दिली.

महाराष्ट्र पोलिसांचा चीनमध्ये स्वातंत्र्य दिन
Follow us on

बीजिंग : देशात सर्वत्र स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत असताना, तिकडे परदेशातही स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांनी चीनमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा करुन देशप्रेमाची प्रचिती दिली.

चीनमधल्या चेंगडू येथे 6 ते 20 ऑगस्टदरम्यान पोलिस फायर गेम्स या जागतिकपातळीवरील पोलिसांसाठीच्या स्पर्धा पार पडत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील पोलिसांनीही सहभाग घेतला आहे.

दोन मिनिटांमुळे नरेंद्र मोदी स्वतःचाच विक्रम मोडण्यापासून वंचित

पोलिस हवालदार प्रदीप शहारे, पोलिस नाईक मंगेश चव्हाण,  मनिषा थिटे, सुनिता औसेकर, प्रशांत सारंग आणि आप्पा कुंभार यांनी या स्पर्धेत सहभागी होत चांगली कामगिरी केली आहे. देशभरात काल स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना या सर्व पोलिसांनी चीनमध्ये सुरु असलेल्या स्पर्धास्थळी तिरंगा फडकवत वंदन केलं.

भारतात उत्साह

देशभरात काल 73 व्या स्वातंत्र्य दिनाचा (73rd Independence Day) उत्साह पाहायला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन सकाळी ध्वजारोहण केलं. त्यानंतर मोदींनी देशाला संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी ‘मेरा देश बदल रहा है’ म्हणत केलेल्या कामाचा आढावा घेतला. तसेच भविष्यातील वाटचालीवरही भाष्य केलं. देशवासियांमधील निराशेचं मळभ दूर झालं आहे. पुढील 5 वर्षात देशवासियांचं स्वप्न पूर्ण करु, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन मोदींनी दिलं.

संबंधित बातम्या 

Independence Day LIVE | वाढती लोकसंख्या हे देशासमोरील मोठं आव्हान : मोदी  

कलम 370 वर नऊ मिनिटं, कोणत्या मुद्द्यावर पंतप्रधानांचं सर्वाधिक भाष्य?  

दोन मिनिटांमुळे नरेंद्र मोदी स्वतःचाच विक्रम मोडण्यापासून वंचित