Maharashtra Corona Update | राज्यात आज सर्वाधिक 9,518 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार

गेल्या 11 दिवसातील सर्वाधिक 9 हजार 518 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाख 10 हजाराच्या पार गेला आहे.

Maharashtra Corona Update | राज्यात आज सर्वाधिक 9,518 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार
Follow us
| Updated on: Jul 20, 2020 | 12:02 AM

मुंबई : महाराष्ट्रात गेल्या 11 दिवसात 93 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत (Maharashtra Total Corona Cases). आज गेल्या 11 दिवसातील सर्वाधिक 9 हजार 518 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचा आकडा 3 लाख 10 हजाराच्या पार गेला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी नव्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेची बाब आहे (Maharashtra Total Corona Cases).

राज्यात शनिवारी (19 जुलै) दिवसभरात 9 हजार 518 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाख 10 हजार 455 वर पोहोचला आहे.

राज्यात दिवसभरात 3 हजार 906 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत 1 लाख 69 हजार 569 रुग्ण बरे झाले आहेत. तर 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 54.62 टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

राज्यात दिवसभरात 258 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये फक्त मुंबईतील 64 रुग्णांचा समावेश आहे. राज्यातील मृत्यूदर हा 3.82 टक्के एवढा आहे. राज्यात आतापर्यंत 11 हजार 854 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे (Maharashtra Total Corona Cases).

राज्यात आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 15 लाख 64 हजार 129 नमुन्यांपैकी 3 लाख 10 हजार 455 नमुने पॉझिटिव्ह (19.85 टक्के) आले आहेत. राज्यात 7 लाख 54 हजार 370 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 45 हजार 846 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात गेल्या 11 दिवसात किती रुग्ण वाढले?

  • 8 जुलै 2020 – 6 हजार 603 रुग्ण
  • 9 जुलै 2020 – 6 हजार 875 रुग्ण
  • 10 जुलै 2020 – 7 हजार 862 रुग्ण
  • 11 जुलै 2020 – 8 हजार 139 रुग्ण
  • 12 जुलै 2020 – 7 हजार 827 रुग्ण
  • 13 जुलै 2020 – 6 हजार 497 रुग्ण
  • 14 जुलै 2020 – 6 हजार 741 रुग्ण
  • 15 जुलै 2020 – 7 हजार 975 रुग्ण
  • 16 जुलै 2020 – 8 हजार 614 रुग्ण
  • 17 जुलै 2020 – 8 हजार 308 रुग्ण
  • 18 जुलै 2020 – 8 हजार 348 रुग्ण
  • 19 जुलै 2020 – 9 हजार 518 रुग्ण

राज्यात कुठे किती रुग्ण?

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

Maharashtra Total Corona Cases

संबंधित बातम्या :

Pune Lockdown | मार्केट यार्ड, भुसार मार्केट पुन्हा सुरु, फुल मार्केट मात्र बंद

Pune Corona | पुणे जिल्हा परिषदेला कोरोनाचा विळखा, 600 पैकी 510 कर्मचारी होम क्वारंटाईन

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.