“मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी”

| Updated on: Oct 10, 2020 | 3:44 PM

आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केली

“मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी”
Follow us on

कोल्हापूर : “सगळीच सत्व परीक्षा मराठा समाजाने द्यावी, अशी भूमिका काही विचारवंतांनी घेतली (Rajendra Kondhare On Maratha Samaj) असून हे चुकीचं आहे”, असं सांगतानाच प्रत्येकवेळी मराठा समाज समन्वयाची भूमिका घेणार नाही. आधीच मराठा समाजाची अवस्था कपाळावर कुंकू असून विधवेसारखी झाली आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी व्यक्त केली (Rajendra Kondhare On Maratha Samaj).

सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी, कोंढरेंची मागणी

“MPSC मध्ये यशस्वी होणारे तरुण केवळ एक टक्का आहे. खासगी क्षेत्रात तरुणांना संधी मिळावी यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावे. बंद असलेली सारथी संस्था पुन्हा मजबूत करावी”, अशी मागणी राजेंद्र कोंढरे यांनी सरकारला केली आहे.

“आम्ही ओबीसीमध्ये आलो आहे, वड्डेटीवार यांचा काहीतरी गैरसमज आहे. संधी मिळाली नाही तर हातात दगड घेणारच ना?”, असंही ते म्हणाले (Rajendra Kondhare On Maratha Samaj).

आंबेडकरांनी छत्रपती घराण्याबाबत आदर ठेवावा – राजेंद्र कोंढरे

“प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती घराण्याबाबत आदर ठेवायला हवा. त्यात आंबेडकर कमी पडत असल्याचे दिसतं”, प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे आणि संभाजीराजेंवर केलेल्या टीकेवर राजेंद्र कोंढरे यांनी त्यांचं मत मांडलं.

सारथीचं उपकेंद्र कोल्हापूरला झालं पाहिजे – राजेंद्र कोंढरे

“सारथीचं उपकेंद्र कोल्हापूरला झालं पाहिजे. आरक्षणाची चोरी होतेय हे उघड आहे. मात्र, राजकरणामुळे हे दाबलं जातं आहे. त्यामुळे मराठा समाज भरडला जातो आहे. सारथीमध्ये अजित पवार यांच्या कामाच्या स्पीडला तग धरणारी यंत्रणा त्याठिकाणी नाही”, असंही ते म्हणाले.

Rajendra Kondhare On Maratha Samaj

संबंधित बातम्या :

राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे

शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे