शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation issue in Mumbai).

शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 5:58 PM

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर होत असलेल्या महत्त्वाच्या बैठकीत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे (Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation issue in Mumbai). यावेळी त्यांनी शाहू महाराजांनी जे आरक्षण बहुजनांना बहाल केलं त्यात आता मराठा समाजच वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली. या मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार असाही सवाल संभाजीराजे यांनी विचारला आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “बहुजनांसाठी शाहू महाराजांनी जे आरक्षण बहाल केलं होतं त्यात मराठा समाजच वंचित राहिला आहे. मग या मराठा समाजाकडे लक्ष कोण देणार? अण्णासाहेब पाटलांपासून जो पहिला लढा झाला त्याला आम्ही सलाम करतो. पण 2007 पासून मी बाहेर पडलो ते 2013-14 ला याच माथाडी कामगार भवनमध्ये माझी नरेंद्र पाटील यांच्यासोबत भेट झाली. नरेंद्र पाटलांनी ठरवलं की राजे तुम्ही नेतृत्व करा, आम्ही सर्व एकत्र येतो. त्यावेळी देखील मी त्यांना हाच शब्द दिला होता की मी नेतृत्व करणार नाही.”

“खांद्याला खांदा लावून मी मराठा समाजासोबत राहिल असं मी सांगितलं होतं. आता ती वेळ पुन्हा आली आहे. त्यावेळी सर्व मराठा संघटना एकत्र आल्या आणि येथूनच आझाद मैदानावर महामोर्चा गेला. त्यावेळी तो लढा यशस्वी झाला. त्यावेळी नारायण राणे समिती होती आणि त्यानंतरच आपल्याला ईएसबीसी आरक्षण मिळालं,” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी नमूद केलं.

“शिवाजी महाराजांचं स्वराज्य 18 पगड जातीचं, मग आज मराठा समाज बाहेर का फेकला गेला?”

संभाजीराजे म्हणाले, “मराठा समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या. सर्व समन्वयक, सहकारी आणि ज्यांनी पुढाकार घेतला, अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव यांचे आभार मानतो. शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले ते सर्व 18 पगड जातीचे होते. आज जातीय विषमता कमी व्हायला हवी, पण ती वाढतेय. मी सर्व समाजाचा आहे, पण आज मराठा समाज बाहेर फेकला गेला आहे. का बाहेर फेकला गेला मराठा समाज?”

“शिवाजी महाराज, शाहू महाराज यांनी बहुजन समाजासाठी सारं काही केलं. आज ते वंचित नाहीत, मात्र मराठा समाज वंचित आहे. मी नरेंद्र पाटलांना भेटलो, त्यांनी मला नेतृत्व करण्याची विनंती केली, पण मी नेतृत्व करणार नाही, तर मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्यासोबत लढणार आहे”, असं संभाजीराजेंनी सांगितलं.

“धोका झाल्यास याला आर्थिक दुर्बल घटकात जाण्याचा आग्रह करणारे जबाबदार”

संभाजीराजे यांनी यावेळी आर्थिक दुर्बल आरक्षणाचा आग्रह करणाऱ्यांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “समन्वयक एकमेकांशी भांडतात, काहींना समाजात दुफळी निर्माण करायची आहे. आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आर्थिक दुर्बल घटकांमध्ये जायचं असेल तर जा. सर्वांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. धोका झाला, तर याला आज जे आर्थिक दुर्बल घटकात जाण्यासाठी आग्रही असतील तेच जबाबदार असतील”, असंही ते म्हणाले.

“सरकारनं मराठा समाजाला फसवलं आहे”

संभाजीराजे यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली. तसेच सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा आरोपही केला. ते म्हणाले, “मराठा समाजाला सरकारनं फसवलं आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या ते का करत नाही? आरक्षण हा समतेचा लढा आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच. सारथी संस्थाही सरकारने बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. मराठा समाजासोबत ते किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी.”

“427 विद्यार्थी एमपीएससीमधून लागले. त्यातील 127 मराठा आहेत, त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण?”, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. तसेच, सरकार अनेक प्रश्न जाणून बुजून सोडवत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

“परीक्षा देणारी 2 लाख मुलं कोरोनाबाधित झाली तर त्याला जबाबदार कोण?”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, “सिद्धार्थ शिंदे वाईचा मुलगा आहे. तो सध्या कोरोना बाधित आहे. तो कसा परीक्षा देणार? अशा विद्यार्थ्यांचं नुकसान का? परीक्षेला बसणारे 2 लाख मुलं कोरोनाबधित झाली तर त्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला कॉल आला होता, मी केला नव्हता. एमपीएससी परीक्षा झाली, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. या मराठा समाजाच्या भावना आहेत.”

“सरकार परीक्षा घेण्याची घाई का करत आहे? हे षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयोमर्यादा संपत आहे त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करुन वयोमर्यादा वाढवा. सर्वांना घेऊन चला. माझी सरकारला विनंती वजा सूचना आहे”, असंही संभाजीरांजे यावेळी म्हणाले.

“संभाजीराजे आता संयमी राहणार नाही”

“संभाजीराजे आता संयमी राहणार नाही. सकल मराठा समाजाने काही निर्णय घेतले तर त्याला माझं समर्थन आहे. मी कायम तुमच्या सोबत आहे. सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मंत्र्यांना निरोप द्यावेत. मंत्र्यांनी मराठा समाजाची व्यथा, दुःख यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. मुख्यमंत्री, मंत्री हे राज्यपालांना मराठा समाजाच्या व्यथा सांगू शकतात. राज्यपाल, राष्ट्रपती यांना सांगून विशेष अधिकार मिळू शकतो”, असंही संभाजीराजे यांनी नमूद केलं.

संभाजीराजे म्हणाले, “आमच्या व्यथा दुःख समजून घ्या. 93 टक्के मराठा समाज गरीब आहे. ओबीसी समाजाचे अनेक नेते आले. धनगर समाजाचे मुस्लिम समाजाचे नेते आले. त्यांचं कौतुक आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घुसायचं नाही. ओबीसी नेते आणि आमच्यात कुठलेही दुरावे होणार नाही. उठ सुठ सुशांत प्रकरण, आमच्याकडे पण लक्ष द्यावे अशी मीडियाला विनंती आहे.”

“राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीची केंद्रं बंद करेल”

“समाजाने आपापल्या वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. म्हणून महाराष्ट्र बंद करणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा”, असा इशारा संभाजीराजेंनी सरकारला दिला.

संबंधित बातम्या :

‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा’

आरक्षणावरील स्थगिती उठवा अथवा वणवा भडकणार; मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम

Live : ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी, संभाजीराजेंच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठिंबा

संबंधित व्हिडीओ :

Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation issue in Mumbai

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.