AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे (Sambhajiraje Chhatrapati allegations on Thackeray Government).

राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज MPSC ची केंद्रं बंद पाडणार : संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Oct 07, 2020 | 5:57 PM
Share

नवी मुंबई : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे (Sambhajiraje Chhatrapati allegations on Thackeray Government). तसेच राज्य सरकार त्यांच्या हातात असणाऱ्या गोष्टीं देखील का करत नाही, असा सवाल केला आहे. “सारथी संस्थाही सरकारने बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. मराठा समाजासोबत ते किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी,” असं मत संभाजीराजे यांनी व्यक्त केलं.

संभाजीराजे यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, “मराठा समाजाला सरकारनं फसवलं आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या ते का करत नाही? आरक्षण हा समतेचा लढा आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच. सरकारने सारथी संस्थाही बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. ते मराठा समाजासोबत किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी.”

“427 विद्यार्थी एमपीएससीमधून लागले. त्यातील 127 मराठा आहेत, त्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याला जबाबदार कोण?”, असा सवाल संभाजीराजेंनी उपस्थित केला. तसेच, सरकार अनेक प्रश्न जाणून बुजून सोडवत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

“परीक्षा देणारी 2 लाख मुलं कोरोनाबाधित झाली तर त्याला जबाबदार कोण?”

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या मुद्द्यावर बोलताना संभाजीराजे म्हणाले, “सिद्धार्थ शिंदे वाईचा मुलगा आहे. तो सध्या कोरोना बाधित आहे. तो कसा परीक्षा देणार? अशा विद्यार्थ्यांचं नुकसान का? परीक्षेला बसणारे 2 लाख मुलं कोरोनाबधित झाली तर त्याला कोण जबाबदार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मला कॉल आला होता, मी केला नव्हता. एमपीएससी परीक्षा झाली, तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील. या मराठा समाजाच्या भावना आहेत.”

हेही वाचा : शाहू महाराजांनी बहुजनांना आरक्षण दिलं, आता मराठा समाजाकडे कोण लक्ष देणार? : संभाजीराजे

“सरकार परीक्षा घेण्याची घाई का करत आहे? हे षडयंत्र आहे का कळत नाही. ज्यांची वयाची मर्यादा संपेल त्यांच्यासाठी वयाची अट शिथिल करुन वय मर्यादा वाढवा. सर्वांना घेऊन चला. माझी सरकारला विनंती वजा सूचना आहे”, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.

“राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीची केंद्रं बंद करेल”

“समाजाने आपापल्या वकिलांनी काय करायला हवं हे ठरवावं, आंदोलनाची दिशा ठरवावी. मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्य सरकार ऐकत नसेल, तर मराठा समाज एमपीएससीचे केंद्र बंद करेल. अनेक लोकांचे नुकसान झाले आहे. म्हणून महाराष्ट्र बंद करणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घ्यावा”, असा इशारा संभाजीराजेंनी सरकारला दिला.

“धोका झाल्यास याला आर्थिक दुर्बल घटकात जाण्याचा आग्रह करणारे जबाबदार”

संभाजीराजे यांनी यावेळी आर्थिक दुर्बल आरक्षणाचा आग्रह करणाऱ्यांवरही हल्ला चढवला. ते म्हणाले, “समन्वयक एकमेकांशी भांडतात, काहींना समाजात दुफळी निर्माण करायची आहे. आपल्याला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आर्थिक दुर्बल घटकांमध्ये जायचं असेल तर जा. सर्वांनी जबाबदारी घेणं गरजेचं आहे. धोका झाला, तर याला आज जे आर्थिक दुर्बल घटकात जाण्यासाठी आग्रही असतील तेच जबाबदार असतील”, असंही ते म्हणाले.

“संभाजीराजे आता संयमी राहणार नाही”

“संभाजीराजे आता संयमी राहणार नाही. सकल मराठा समाजाने काही निर्णय घेतले तर त्याला माझं समर्थन आहे. मी कायम तुमच्या सोबत आहे. सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मंत्र्यांना निरोप द्यावेत. मंत्र्यांनी मराठा समाजाची व्यथा, दुःख यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. मुख्यमंत्री, मंत्री हे राज्यपालांना मराठा समाजाच्या व्यथा सांगू शकतात. राज्यपाल, राष्ट्रपती यांना सांगून विशेष अधिकार मिळू शकतो”, असंही संभाजीराजे यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Exclusive : महाराष्ट्र बंदला पाठिंबा नाही; बंद पुकारून काय फायदा होईल?; संभाजीराजेंचा सवाल

संभाजीराजे म्हणाले, “आमच्या व्यथा दुःख समजून घ्या. 93 टक्के मराठा समाज गरीब आहे. ओबीसी समाजाचे अनेक नेते आले. धनगर समाजाचे मुस्लिम समाजाचे नेते आले. त्यांचं कौतुक आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घुसायचं नाही. ओबीसी नेते आणि आमच्यात कुठलेही दुरावे होणार नाही. उठसूठ सुशांत प्रकरण, आमच्याकडे पण लक्ष द्यावे अशी मीडियाला विनंती आहे.”

संबंधित बातम्या :

‘मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने संविधान दुरुस्ती करुन वटहुकूम काढावा’

आरक्षणावरील स्थगिती उठवा अथवा वणवा भडकणार; मराठा आंदोलक आंदोलनावर ठाम

Live : ओबीसी नेत्यांची मराठा बैठकीला हजेरी, संभाजीराजेंच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठिंबा

संबंधित व्हिडीओ :

Sambhajiraje Chhatrapati allegations on Thackeray Government

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?