भारताने चीनलाही झुकवलं, अखेर मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

न्यूयॉर्क : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. […]

भारताने चीनलाही झुकवलं, अखेर मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित
Follow us on

न्यूयॉर्क : भारताने जागतिक स्तरावर मोठा डिप्लोमॅटिक विजय मिळवलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलंय. यापूर्वी चीनने या प्रस्तावाला आडकाठी केली होती. पण चीनने त्यांचा आक्षेप मागे घेत भारताच्या वतीने आलेल्या या प्रस्तावाला पाठिंबा दिला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन आणि रशियाने याअगोदरच या प्रस्तावासाठी पुढाकार घेतला होता. पण चीनने तांत्रिक कारण दाखवत आडकाठी केली होती.

Big,small, all join together असं म्हणत भारताचे संयुक्त राष्ट्रातील प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याची माहिती दिली. चीनने कालच चर्चेतून मार्ग काढण्याचं म्हटलं होतं. त्यानंतर भारताच्या बाजूने भूमिका घेत यूएनएससीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आणि मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आलं.

जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील संघटना जैश ए मोहम्मदने घेतली. यानंतर फ्रान्सने पुढाकार घेत मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत प्रस्ताव आणला. या प्रस्तावाला यूएनएससीचे चार स्थायी सदस्य फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिकेचा पाठिंबा होता. पण पाचवा स्थायी सदस्य असलेल्या चीनने तांत्रिक कारण दाखवलं होतं. चीननेही आंतरराष्ट्रीय दबावापुढे झुकत अखेर या प्रस्तावाला पाठिंबा दिला.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचा फायदा काय?

मसूद पाकिस्तानमध्ये आहे हे सर्व जगाला माहित आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला देशात ठेवणं पाकिस्तानला परवडणारं नाही. मसूद अजहरवर कारवाई न केल्यास विविध मार्गातून पाकिस्तानला एकटं पाडलं जाईल. परिणामी दबावातून मसूदवर कारवाई करावीच लागेल. याशिवाय मसूदला आता जगातील कोणत्याही देशात जाता येणार नाही. त्याची जगभरातील संपत्ती जप्त केली जाईल.

संबंधित बातम्या :

मसूद अजहरविरोधात अमेरिकेचा नवा प्रस्ताव, चीनचा तिळपापड

मसूद अजहरवर बंदी घालण्यासाठी अमेरिकेची नवी रणनीती

परदेश दौऱ्यांची गुंतवणूक

ऑपरेशन थंडरबोल्ट : घरात घुसून मारणं याला म्हणतात!

चीनच्या वस्तूंवर बंदी घालणं भारताला खरंच शक्य आणि परवडणारं आहे का?

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात चीनची चौथ्यांदा आडकाठी