सूरतहून निघालेली मजुरांची बस वर्ध्यात उलटली, तिघे जखमी

| Updated on: May 03, 2020 | 9:30 AM

नागपूर अमरावती महामार्गाच्या कारंजा येथील कोहली पेट्रोल पंपाजवळ (Migranant workers bus accident)  मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटी झाली.

सूरतहून निघालेली मजुरांची बस वर्ध्यात उलटली, तिघे जखमी
Follow us on

वर्धा :  नागपूर अमरावती महामार्गाच्या कारंजा येथील कोहली पेट्रोल पंपाजवळ (Migranant workers bus accident)  मजुरांना घेऊन जाणारी बस आज सकाळी पलटी झाली. ही बस सूरत येथून ओदिशाला जात होती. या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले आहेत. या मजुरांना उपचारासाठी कारंजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, बस चालक, क्लिनर आणि इतर प्रवासी जखमींना वाटेतच सोडून दुसऱ्या वाहनाने पसार झाले (Migranant workers bus accident).

केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना इतर राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरीत मजूर, विद्यार्थ्यांना आपापल्या राज्यात घेऊन जाण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे काल (2 मे) रात्री गुजरातच्या सूरत शहराहून ओदिशाला जाणारी बस रवाना झाली. या बसमध्ये 50 मजूर होते. ही बस नागपूर अमरावती महामार्गाच्या कारंजा येथे आली असता गाडीसमोर अचानक वन्य प्राणी आला. त्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि बस पलटी झाली.

या दुर्घटनेत तीन मजूर जखमी झाले. मात्र, या मजुरांना तिथेच सोडून बस चालक, क्लिनर आणि इतर प्रवासी दुसऱ्या गाडीने पसार झाले. या जखमी मजुरांसोबत फक्त दोन इतर व्यक्ती होते. अखेर कारंजा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.

“कारंजा टोल नाक्यासमोर बसचा अपघात झाला आहे, अशी माहिती फोनमार्फत आज सकाळी पहाटे पाच वाजेच्या सुमारास मिळाली. अपघाताची माहिती मिळताच आम्ही तातडीने आमच्या पथकासह घटनास्थळी दाखल झालो. तिथे गेल्यावर कारंजा टोल नाक्याच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असल्याची माहिती मिळाली. तर बसमधील इत प्रवासी आणि वाहन चालक तिथून निघून गेले होते. याप्रकरणी पुढील तापस सुरु आहे”, अशी माहिती तपास अधिकारी नीरज लोही यांनी दिली.