Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी, खासदार अनुप्रिया पटेल यांचे पंतप्रधानांना साकडे!

| Updated on: Oct 25, 2020 | 1:56 PM

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल यांनी ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Mirzapur 2 Controversy | ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी, खासदार अनुप्रिया पटेल यांचे पंतप्रधानांना साकडे!
Follow us on

मुंबई : लोकप्रिय वेब सीरीज ‘मिर्झापूर’चा दुसरा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या वेब सीरीजला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. एकीकडे या वेब सीरीजची लोकप्रियता वाढत असताना, दुसरीकडे ‘मिर्झापूर’वर बंदीची घालण्याची मागणी (Mirzapur Controversy) केली जात आहे. उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरच्या खासदार अनुप्रिया पटेल (Anupriya Patel) यांनी ‘मिर्झापूर 2’वर बंदी घालण्याची मागणी केली आहे. ट्विट करत त्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना टॅग केले आहे. (Mirzapur 2 controversy MP Anupriya Patel appeal to PM modi for ban web series)

‘मिर्झापूर’ वेब सीरीजमधून ‘मिर्झापूर’ची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिर्झापूरच्या खासदार या नात्याने मला हे मान्य नसल्याचे म्हणत त्यांनी ट्विटरद्वारे थेट पंतप्रधान मोदींना साकडे घातले आहे.

हिंसक प्रदेश म्हणत बदनामी केल्याचा दावा

अनुप्रिया पटेल यांनी ट्विट करत लिहिले की, ‘माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि आदरणीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्या नेतृत्वात ‘मिर्झापूर’ विकसित होत आहे. इथे लोकांमध्ये छान सुसंवाद आहे. मात्र, ‘मिर्झापूर’ नावाच्या वेब सीरिजद्वारे याची हिंसक क्षेत्र म्हणून बदनामी केली जात आहे. या मालिकेतून जातीय वैमनस्य पसरवले जात आहे. ‘मिर्झापूर’ जिल्ह्याची खासदार या नात्याने या सगळ्याबाबत चौकशी झाली पाहिजे आणि त्याविरोधात कारवाई करावी, अशी माझी मागणी आहे.’(Mirzapur 2 controversy MP Anupriya Patel appeal to PM modi for ban web series)

‘मिर्झापूर 2’ 22 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे. ‘मिर्झापूर’नंतर प्रेक्षक या दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत होते. या वेब सीरीजची कथा काल्पनिक असून, वास्तवाशी या घटनांचा काहीही संबंध नसल्याचे निर्मात्यांनी स्पष्ट केले आहे. मात्र अनुप्रिया पटेलच नव्हे तर, अनेकानी या वेब सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या वेब सीरीजमधून मिर्झापूरची बदनामी होत असल्याचा आरोप या सगळ्यांनी केला आहे.

‘मिर्झापूर 2’ची सोशल मीडियावर हवा!

‘मिर्झापूर 2’मध्ये पंकज त्रिपाठी, दिव्येंदु शर्मा, श्वेता त्रिपाठी, अली फजल या कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांना पुन्हा एकदा भुरळ पाडली आहे. कथेत रंजकता आणण्यासाठी यावेळच्या दुसऱ्या पर्वात काही नवीन कलाकारदेखील दिसले आहेत. ‘मिर्झापूर’ प्रमाणेच ‘मिर्झापूर 2’मध्येही कालीन भैय्याच्या जादूने प्रेक्षक खुर्चीशी खिळून राहिले आहेत. ‘मिर्झापूर 2’ प्रदर्शित झाल्यांनतर सोशल मीडियावरदेखील या वेब सीरीजची हवा पाहायला मिळाली.

‘मिर्झापूर’ची पुढची कथा या पर्वात पाहायला मिळाली आहे. पहिल्या पर्वाच्या शेवटच्या भागात मुन्ना त्रिपाठीने,  बबलू पंडित आणि स्वीटी यांना ठार मारले आहे. गुड्डू पंडित आणि गोलू हे दोघे अद्याप जिवंत आहेत. यांच्या जिवंत असण्यामुळेच आता मिर्झापूरमध्ये सुडाच्या भावनेने सगळा गदारोळ माजणार आहे. मुन्ना आणि त्याचे वडील कालीन भैय्या यांच्याकडून गुड्डू पंडित, भाऊ आणि त्याची पत्नी यांच्या हत्येचा बदला घेणार आहे.

(Mirzapur 2 controversy MP Anupriya Patel appeal to PM modi for ban web series)