
मराठी मनोरंजन विश्वातलं ‘क्युट कपल’ अर्थात अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनी खास अंदाजात एकमेकांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

मागील वर्षी या क्युट कपलचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता.

या वर्षी दोघांच्या लग्नाचा बार उडवला जाणार होता.

मात्र, कोरोनामुळे त्यांनी लग्न लांबणीवर टाकले आहे.

पुढच्या वर्षी मिताली आही सिद्धार्थ लग्न बंधनात अडकणार आहेत.

‘पुढच्या वर्षी मिस्टर अँड मिसेस’ म्हणत मितालीने सिद्धार्थला ‘पाडव्या’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.