महाराष्ट्रातील ‘या’ आमदाराची कोरोनाग्रस्तांसाठी मदत, खासगी रुग्णालय पालिकेकडे सुपूर्द

| Updated on: Apr 13, 2020 | 8:09 AM

दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु (MLA Raju Patil Help to Corona Patient) आहेत.

महाराष्ट्रातील या आमदाराची कोरोनाग्रस्तांसाठी मदत, खासगी रुग्णालय पालिकेकडे सुपूर्द
Follow us on

डोंबिवली : दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न सुरु (MLA Raju Patil Help to Corona Patient) आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण-डोंबिवलीमधील आमदार राजू पाटील यांनी आपले खासगी रुग्णालय कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी महापालिकेच्या ताब्यात दिले. राजू पाटील यांच्या या निर्णयामुळे सर्वच (MLA Raju Patil Help to Corona Patient) स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.

आतापर्यंत राज्यातीन अनेक आमदारांनी कोरोनाग्रस्तांसाठी मदत केली आहे. पण राजू पाटील यांनी थेट आपले घरचे रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी उपलब्ध करुन दिले आहे. राजू पाटील यांच्या आर. आर. रुग्णालयात 15 ते 20 व्हेंटीलेटर आहेत. 100 बेड आहे. हे खासगी रुग्णालय केडीएमसीच्या अंतर्गत येते.

आमदार राजू पाटील यांना 24 मार्चला कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या आयुक्तांनी सुचना केली होती की, कोरोना रुग्णांसाठी शहरातील एखादे खासगी रुग्णालय पूर्णत: कोरनाग्रस्त रुग्णांसाठी घ्यावे. जेणेकरुन डोंबिवली आणि आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांना चांगली सुविधा मिळेल. आयुक्तांच्या या सूनेनंतर राजू पाटील यांनी स्वतःचे  आर.आर. रुग्णालयही तात्पुरते के़डीएमसीच्या ताब्यात देण्याची तयारी दाखवली.

राजू पाटील यांच्या आर. आर. रुग्णालय पालिकेने ताब्यात घेतले असून तिथे आता कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील आणि आयएमएचे डॉक्टर रुग्णांवर उपचार करणार आहेत.