धर्म कोणताही असो, आम्ही ‘त्यांना’ हिंदू मानतो : मोहन भागवत

| Updated on: Dec 26, 2019 | 8:50 AM

ज्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना आहे, भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेविषयी ज्यांच्या मनात सन्मान आहे, ते हिंदूच आहेत, असं भागवत म्हणाले.

धर्म कोणताही असो, आम्ही त्यांना हिंदू मानतो : मोहन भागवत
Follow us on

मुंबई : भारताची पंरपरा हिंदुत्ववादी आहे, भारतात जन्मलेल्या व्यक्तीचा धर्म किंवा प्रदेश कोणताही असो, संघ हा देशातील 130 कोटी जनतेला हिंदू मानतो, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat on Hindu and RSS) केलं आहे.

धर्म किंवा संस्कृती कोणतीही असो, ज्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची भावना आहे, भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरेविषयी ज्यांच्या मनात सन्मान आहे, ते हिंदूच आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ 130 कोटी जनतेला हिंदू मानतो. संपूर्ण समाज आमचा आहे आणि संघटित समाजाची निर्मिती करणं हे संघाचं उद्दिष्ट आहे, असंही भागवतांनी स्पष्ट केलं.

संभाजी भिडेंची जीभ घसरली, अपत्यहीन स्त्रियांना हिणवणारं वक्तव्य

‘भारतमातेचा पुत्र, त्याला कोणत्याही भाषेचं बंधन नाही, तो कुठल्याही भागातील असो, कोणत्याही स्वरुपाची पूजा करो किंवा कोणत्याही पूजेवर त्याचा विश्वास नसो, एक हिंदू आहे, संघासाठी भारत देशातील सर्व 130 कोटी जनता हिंदू समाज आहे.’ असंही भागवत पुढे म्हणाले.

संघाने सर्वांना स्वीकारले आहे, सर्वांबद्दल त्यांचे चांगले विचार आहेत आणि त्यांच्या उत्कर्षाची इच्छा आहे, असंही भागवतांनी सांगितलं. मोहन भागवत बुधवारी तेलंगणात संघातील स्वयंसेवकांना तीन दिवसीय विजय संकल्‍प शिबिरामधे (Mohan Bhagwat on Hindu and RSS) संबोधित करत होते.