पुण्यात गॅस सिलेंडर लीकेज झाल्याने आग, आई-मुलगा होरपळले

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला गळती लागल्याने अर्थात गॅस सिलेंडर लीकेज झाल्याने आई आणि मुलगा भाजला आहे. पुण्यातील गुरुवार पेठेतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली. गॅस सिलेंडर लीकेजमुळे ही आग लागली. या आगीत अनुपमा जोशी (वय 55) आणि त्यांचा मुलगा हेमांश जोशी (वय 30)  हे दोघे भाजले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने […]

पुण्यात गॅस सिलेंडर लीकेज झाल्याने आग, आई-मुलगा होरपळले
Follow us on

पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरला गळती लागल्याने अर्थात गॅस सिलेंडर लीकेज झाल्याने आई आणि मुलगा भाजला आहे. पुण्यातील गुरुवार पेठेतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही घटना घडली.

गॅस सिलेंडर लीकेजमुळे ही आग लागली. या आगीत अनुपमा जोशी (वय 55) आणि त्यांचा मुलगा हेमांश जोशी (वय 30)  हे दोघे भाजले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत, आगीवर नियंत्रण मिळवलं. मात्र या आगीत अनुपमा जोशी गंभीर जखमी झाल्या आहेत. तर त्यांच्या मुलाला किरकोळ जखम झाली आहे. सध्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

रहिवाशी वसाहतीत ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचं वातारण आहे. हा गॅस सिलेंडर लीकेज कसा झाला याबाबत चौकशी होईल, पण सध्या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

सुदैवाने अग्निशमन दलाने तातडीने धाव घेऊन आग विझवल्याने मोठी हानी टळली.