AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाचा घरी गळफास ; दुःख सहन न झाल्याने आईचाही शेतात गळफास

लातूर : मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकून आईनेही आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. लातूरच्या निलंगा तालुक्यातील निठुर येथे ही हृदयद्रावक घटना घडली. या माय-लेकाच्या मृत्यूने निठुर गावात शोककळा पसरली आहे. निठुर गावात नितीन सुभाष घोडके हा 30 वर्षीय तरुण आपल्या आई आशाबाई (50) सोबत राहायचा. शुक्रवारी नितीनने आई शेतात गेली असताना आपल्या […]

मुलाचा घरी गळफास ; दुःख सहन न झाल्याने आईचाही शेतात गळफास
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM
Share

लातूर : मुलाच्या आत्महत्येची बातमी ऐकून आईनेही आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडली. लातूरच्या निलंगा तालुक्यातील निठुर येथे ही हृदयद्रावक घटना घडली. या माय-लेकाच्या मृत्यूने निठुर गावात शोककळा पसरली आहे.

निठुर गावात नितीन सुभाष घोडके हा 30 वर्षीय तरुण आपल्या आई आशाबाई (50) सोबत राहायचा. शुक्रवारी नितीनने आई शेतात गेली असताना आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मुलाने आत्महत्या केल्याचं जेव्हा आशाबाई यांना सांगण्यात आलं, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. म्हातारपणात ज्या मुलाच्या आधारे आपल्याला जगायचे होते, तो आधारच आता राहिलेला नाही, आपल्या मुलाचा मृत्यू झाला आहे, याचे दुःख आशाबाईंना सहन झाले नाही. त्यामुळे त्यांनीही शेतातच स्वत:ला गळफास लावून घेतला.

आधी मुलगा आणि त्याच्या विरहात आईने आपले जीवन संपवल्याने निठुर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मात्र नितीन घोडकेने आत्महत्या का केली याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

Follow Us
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती....
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, पवारांची प्रकृती.....
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू...
गिधाड धमक्या देऊ नका, तुम्ही संप पुकारलात तर आम्हीही रस्त्यावर उतरू....
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर
बीड कारागृहातून धक्कादायक माहिती, आणखी एक ऑडिओ क्लिप समोर.
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले....
गांधी हत्येचं मुनींकडून समर्थन, हर्षवर्धन सपकाळ भयंकर संतापले.....
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध
सदावर्ते यांच्या मराठी विरोधातील भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांचा विरोध.
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत
सहानुभूतीची लाट की राजकीय गणित?; पवार कुटुंबातील सदस्याचं विधान चर्चेत.
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड
लिंगपिसाट खरातला घाम फोडणारी बातमी, बडा मासा ईडीच्या जाळ्यात; थेट धाड.
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान
बारामती पोटनिवडणूक: काटेवाडीत सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंबाचे मतदान.
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा
रिक्षा-टॅक्सी चालकांचा सरकारविरोधात आक्रमक पवित्रा.
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.