मुलाच्या नशेला कंटाळून आईकडून जेवणात विष, मृतदेहाचे अनेक तुकडे

तामिळनाडूमध्ये आईनेच आपल्या इंजीनिअर मुलाची हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली (Mother kill son in tamilnadu) आहे.

मुलाच्या नशेला कंटाळून आईकडून जेवणात विष, मृतदेहाचे अनेक तुकडे
| Edited By: | Updated on: Feb 19, 2020 | 7:48 PM

चेन्नई : तामिळनाडूमध्ये आईनेच आपल्या इंजीनिअर मुलाची हत्या केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली (Mother kill son in tamilnadu) आहे. मुलगा सतत दारुच्या नशेत असायचा. त्याच्या या सवयीला कंटाळून आईने थेट मुलाच्या जेवणात विष टाकले. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे तुकडे करुन ते फेकले. ही घटना तामिळनाडूच्या कुंबुमची आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास सुरु (Mother kill son in tamilnadu) आहे.

“मृत मुलाची आई मुलाच्या नशेच्या वाईट सवीयला कंटाळली होती. कारण तिचा मुलगा नेहमी नशेत राहून घरच्यांना त्रास द्यायचा. ऑफिसमध्येही तो नशेत असायचा. त्यानंतर त्याच्यावर ऑफिसमधून कारवाई करण्यात आली होती. तसेच चोरीच्या घटनामध्येही त्याचा समावेश असल्याचे समोर आले होते”, असं पोलिसांनी सांगितले.

“एका स्थानिकाने एका मिहला आणि पुरुषाला गोणीतून काहीतरी फेकताना पाहिले होते. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणि मृत मुलाच्या आईची चौकशी केली. त्यानंतर मृत मुलाच्या आईने गुन्ह्याची कबूल दिली”, असही पोलिसांनी सांगितले.

“विघ्नेश्वर रविवारी (16 फेब्रुवारी) घरी आला. तेव्हा त्याच्या आईने जेवणात विष टाकले. त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेने त्याच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे करुन ते शहरातील विविध भागात फेकले. तसेच या महिलेसोबत कोण होते याचा शोध सध्या आम्ही घेत आहोत”, असंही पोलिसांनी सांगितले.