गाडीच्या बोनेटवर चटणी भाकरीचा आस्वाद, संभाजीराजेंनी कार्यकर्त्याची शिदोरी सोडली

| Updated on: Sep 28, 2020 | 9:24 PM

कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही, असं म्हणत कार्यकर्त्याने दिलेली शिदोरी छत्रपती संभाजीराजेंनी आनंदाने चाखली. (Mp Chhatrapati Sambhajiraje Accept Lunch Given By karykarta)

गाडीच्या बोनेटवर चटणी भाकरीचा आस्वाद, संभाजीराजेंनी कार्यकर्त्याची शिदोरी सोडली
Follow us on

मुंबई : कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही, असं म्हणत कार्यकर्त्याची शिदोरी खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आनंदाने चाखली. दिवसभर काही खाल्लं नसल्याने कार्यकर्त्याने दिलेली चटणी भाकरी पोटभर खाऊन मुंबईला निघाल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं. (Mp Chhatrapati Sambhajiraje Accept Lunch Given By karykarta)

“कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही. आज रायगड किल्ल्याच्या कामांची पाहणी करून खाली यायला दुपार उलटली होती. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. रस्त्याच्या कडेला गाडी लावून जेवण करायला संध्याकाळचे 4:30 वाजले होते. पोटभर जेवण करून, पुन्हा मुंबईला महत्वाच्या बैठकीला निघाल्याचं”, संभाजीराजेंनी सांगितलं.

संभाजीराजेंनी पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये गाडी रस्त्याच्या कडेला थांबवून कार्यकर्त्याने दिलेल्या शिदोरीचा आस्वाद गाडीच्या बोनेटवरच संभाजीराजेंनी घेतला. धावपळ असल्याने घाईघाईतच त्यांनी जेवणं उरकलं.

“दिल्लीतून निघून, नाशिक मधील राज्यस्तरीय मराठा मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपवून दुसऱ्या दिवशी रायगडला आलो. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून कोल्हापूरला राजवाड्यावर गेलो नाही”, असंही संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“रायगडवरून कोल्हापूरला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यात असतानाच फोन आला की राजे आपण मुंबईला जाणं अत्यंत महत्वाचे आहे. मला घरी जाणं सुद्धा महत्त्वाचं होतं. पण मी तो पर्याय टाळला आणि मुंबईला जाण्यासाठी निघालो. समाजाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने मला जाणं भाग आहे. छत्रपतींना स्वतः पेक्षा समाज महत्वाचा असतो”, अशी टिप्पणी देखील संभाजीराजेंनी केली.

(Sambhajiraje Accept Lunch Given By karykarta)

संबंधित बातम्या

उदयनराजेंच्या बहिणीच्या आग्रहानंतर संभाजीराजे भेटीला, नाशकात मनिषाराजेंची सदिच्छा भेट

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही, गोळी असो की तलवार, पहिला वार माझ्यावर: संभाजीराजे