उदयनराजेंच्या बहिणीच्या आग्रहानंतर संभाजीराजे भेटीला, नाशकात मनिषाराजेंची सदिच्छा भेट

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात मराठा आंदोलनाच्या नेतृत्वावरुन फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक असल्याचे बोलले जाते.

उदयनराजेंच्या बहिणीच्या आग्रहानंतर संभाजीराजे भेटीला, नाशकात मनिषाराजेंची सदिच्छा भेट

नाशिक : राज्यसभेवरील खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाजपचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे यांच्या बहिणीची भेट घेतली. नाशिकमध्ये राहणाऱ्या मनिषा राजे यांच्या घरी संभाजी राजेंनी सदिच्छा भेट दिली. (Chhatrapati Sambhajiraje meets Chhatrapati Udayanraje’s sister Manisharaje)

उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्यात मराठा आंदोलनाच्या नेतृत्वावरुन फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही मोठी चपराक असल्याचे बोलले जाते. मनिषा राजे यांच्या आग्रहानंतर संभाजीराजेंनी भेट घेतल्याची माहिती आहे.

संभाजीराजे दोनच दिवसांपूर्वी नाशिकमध्ये झालेल्या राज्यस्तरीय सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. दिवसभर ही बैठक चालली होती. समाजाची भावना समजून सर्वानुमते आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार असल्याचे संभाजीराजेंनी ट्विटरवरुन सांगितले होते.

“मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी लोकप्रतिनिधींचा ओघ वाढतच आहे. अनेक सामाजिक संघटनांनीही पाठिंबा देण्यास सुरुवात केली आहे. सर्व पक्ष, नेते मंडळी, विविध संघटना यांची मोट बांधून त्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न मी करत आहे.” असं ट्विटरवर लिहित संभाजीराजेंनी आरक्षणाला पाठिंबा दर्शवणाऱ्या खासदार-आमदारांची यादी जाहीर केली होती.

दुसरीकडे, मराठा आरक्षण देता येत नसेल तर सगळंच आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काल केली होती. मराठा समाजातील मुलांना चांगले गुण मिळूनही अ‍ॅडमिशन मिळत नाही, मात्र इतर समाजात कमी गुण असतानाही प्रवेश मिळतो. देवाने प्रत्येकाला बुद्धी दिली, आहे त्याप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करुन, मार्क असूनही अ‍ॅडमिशन न मिळाल्यामुळे मराठा समाजातील अनेक मुलांना नैराश्य येत आहे, अशी खंत उदयनराजे यांनी व्यक्त केली.

मराठा आरक्षण नेतृत्वासाठी मेटेंचा उदयनराजेंना आग्रह

मराठा आरक्षणविषयी लढ्याचे नेतृत्त्व खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी करावे, अशी लेखी मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केली होती. तसंच “जगात छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. त्यांचे 13 वे वंशज छत्रपती उदयनजी महाराज यांनी पुढाकार घ्यावा. मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटनांना उदयनराजे भोसले यांनी एकत्र करावे. मराठा समाजाचे सारथी, बलिदानांना न्याय मिळण्यासाठी नियोजन करावं, पुढची भूमिका ठरवावी आणि ते लवकरात लवकर करावे” असा आग्रह शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंनी केला होता. (Chhatrapati Sambhajiraje meets Chhatrapati Udayanraje’s sister Manisharaje)

संबंधित बातम्या

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंकडून मोदींना पत्र, भेटीची मागणी

संभाजी छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही, गोळी असो की तलवार, पहिला वार माझ्यावर: संभाजीराजे

(Chhatrapati Sambhajiraje meets Chhatrapati Udayanraje’s sister Manisharaje)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *