बिहारमधून 7 वर्षीय मुलाचे अपहरण, खंडणीसाठी मुंबईतून फोन, चौघांना अटक

| Updated on: Oct 22, 2020 | 9:08 AM

हा खंडणी मागणारा फोन मुंबईतील कांदिवली परिसरातून आल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली. (Mumbai Police Arrested Four People for bihar kidnapping case)

बिहारमधून 7 वर्षीय मुलाचे अपहरण, खंडणीसाठी मुंबईतून फोन, चौघांना अटक
Follow us on

मुंबई : बिहारमधील एका 7 वर्षीय मुलाचे अपहरण करुन त्याच्या कुटुंबियांकडे 20 लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. रियासुद्दीन अन्सारी या या आरोपीचे नाव आहे. त्याला बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. त्याच्यासह बिहार पोलिसांनी खान मुहम्मद अन्सारी, अलाउद्दिन अन्सारी आणि मुस्लिम अन्सारी या आणखी तिघांना बिहारमधून अटक केली आहे. (Mumbai Police Arrested Four People for bihar kidnapping case)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबरला बिहारमधील चंपारण्य भागातील धनहा गावात राहणाऱ्या 7 वर्षीय मुबारक अन्सारी या मुलाचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबाकडे 20 लाख रुपये खंडणी मागण्यात आली होती. हा खंडणी मागणारा फोन मुंबईतील कांदिवली परिसरातून आल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली. त्यानंतर बिहार पोलिसांनी कांदिवली पोलिसांना तात्काळ याबाबत कळवले.

यानंतर कांदिवली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी रियासुद्दीन अन्सारीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला बिहार पोलिसांच्या हवाली केले.

मुंबई पोलिसांच्या मदतीमुळे बिहार पोलिसांना उर्वरित आरोपी आणि त्या मुलाचा ही छडा लागला. त्याला शोधून सुखरूप त्याच्या कुटुंबियांकडे देण्यात आले. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी हे कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे त्यांना पैशाची गरज होती. त्यामुळेच त्यांनी ही गुन्हा केला होता.

दरम्यान मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्या एकत्रित कामगिरीमुळे एक मुलगा सुखरूप त्यांच्या कुटुंबाला मिळाला. तसेच आरोपी देखील गजाआड झाले. त्यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.(Mumbai Police Arrested Four People for bihar kidnapping case)

संबंधित बातम्या : 

कल्याणमध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर ड्रग्ज माफियांचा प्राणघातक हल्ला, चौघांना अटक

मटणाच्या दुकानातून चाकू चोरीला, एकाचा खून, चौघे जखमी, बंगळुरुत माथेफिरुला अटक