नांदेडमध्ये लोकशाहीची क्रूर चेष्टा, ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा साडेदहा लाखात लिलाव

महाटी गावातील हा व्हिडीओ असून यात गावातील उपसरपंचपदासाठी चक्क बोली लावण्यात आली आहे. (Nanded Gram Panchayat Election auction for Up Sarpanch Post)

नांदेडमध्ये लोकशाहीची क्रूर चेष्टा, ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा साडेदहा लाखात लिलाव
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 8:25 AM

नांदेड : लोकशाहीची क्रूर चेष्टा करणारा एक व्हिडीओ सध्या नांदेडमध्ये प्रचंड व्हायरल झाला आहे. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पुन्हा पैशाची सोय याची प्रचिती देणारा हा व्हिडीओ आहे. नांदेडमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीपुर्वी सरपंच आणि उपसरपंचपदाचा जाहीर लिलाव करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुदखेड तालुक्यातील महाटी गावातील हा व्हिडीओ असून यात गावातील उपसरपंचपदासाठी चक्क बोली लावण्यात आली आहे. (Nanded Gram Panchayat Election auction for Up Sarpanch Post)

महाटी या गावातील सरपंचपद ओबीसीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे उपसरपंचपद आपल्या ताब्यात राहावे यासाठी काही धन दांडग्यानी ही बोली लावली आहे. त्यात उपसरपंचपदाची साडेदहा लाखाला विक्री झाली आहे. गावात वीट भट्ट्या आणि रेतीचा व्यवसाय तेजीत असून त्यात रग्गड कमाई होते. त्यासाठी हा लिलाव करण्यात आला आहे.

गावचे पुढारी निवडण्यासाठी लोकशाहीत मतदानाचा अधिकार गावकऱ्यांना असतो. मात्र गावातील इरसाल पुढारी लोकशाहीचे लोणचे बनवून तिला तोंडी लावताना दिसत आहेत. त्यातून गावातील पुढारी पदाचा थेट लिलाव केला जातं आहे. या लिलावातून आलेल्या पैशातून गावातील शाळा डिजीटल करणार असल्याचे गोंडस कारण स्थानिक सांगत आहेत.

पण अशा लिलावाच्या पैशातून बनलेल्या शाळेत शिकणारे विद्यार्थी काय आदर्श घेतील याची कल्पनाही करवत नाही. त्यामुळे अशाप्रकारे लिलाव करणाऱ्यावर काय कारवाई होते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.

महाटी गावाचे महत्व

गोदावरी नदीच्या समृद्ध काठावर महाटी गाव वसलेले आहे. नांदेडपासून जवळच असलेल्या या गावाचा एकेकाळी मुख्य व्यवसाय हा शेती होता. मात्र आता या गावात गोदावरी नदीची मुबलक माती उपलब्ध असल्याने असंख्य वीटभट्ट्या तयार झाल्या आहेत. तसेच गोदावरी नदीपात्रातून रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होते. या दोन्ही व्यवसायातून कोट्यावधींची उलाढाल होत असल्याने गावात पैशाचे झरे वाहत आहेत. त्यातूनच गावातील पुढारीपणाचा थेट लिलाव करण्याचे धाडस या गावात झालं आहे. (Nanded Gram Panchayat Election auction for Up Sarpanch Post)

संबंधित बातम्या : 

Breaking: कानपूरमध्ये तीन मजली इमारत कोसळली, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

…अन् ‘त्या’ एका चुकीमुळे ऑक्सफर्डची लस अधिक परिणामकारक असल्याचा लागला शोध

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.