मोदीजी खात्यात 15 लाख रुपये पाठवणार आहेत, मेसेजनंतर लोकांच्या बँकेबाहेर रांगा

| Updated on: Aug 01, 2019 | 4:55 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर केरळमध्ये लोकांनी बँकेबाहेर नवं खातं उघडण्यासाठी गर्दी केली.

मोदीजी खात्यात 15 लाख रुपये पाठवणार आहेत, मेसेजनंतर लोकांच्या बँकेबाहेर रांगा
Follow us on

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर केरळमध्ये लोकांनी बँकेबाहेर नवं खातं उघडण्यासाठी गर्दी केली. यावेळी लोकांच्या लांबच लांब रांगा बँकेबाहेर लागल्या.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका मेसेजला खरं मानून लोक पोस्टात बँक खातं उघडण्यासाठी बँकेसमोर जमले. रांगेत उभ्या असलेल्या लोकांच्या मते, सरकार पंतप्रधानांचं 15 लाख रुपये देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यासाठी योजना बनवत आहे.

केरळच्या प्रसिद्ध पर्यटक स्थळ मुन्नारच्या चहाच्या मळ्यात काम करणारे हजारो लोक हे मजूर आहेत. हेच मजूर बँकेत खातं उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसबाहेर जमले होते. ज्या व्यक्तीचं पोस्टात बँक खातं आहे. त्या व्यक्तीला केंद्र सरकार 15 लाख रुपये देणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. त्यानंतर या बँकापूढे लोकांच्या रांगा लागण्यास सुरुवात झाली.

यादरम्यान, लोक आपली सर्व कामं सोडून पोस्ट ऑफिसबाहेर रांगेत उभे झाले. या मेसेजचा इतक्या मोठ्या प्रमाणात परिणाम झाला की, एकट्या मुन्नारमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये 1050 पेक्षा जास्त नवे खाते उघडण्यात आले.

यापूर्वी देवीकुलम आरडीओ कार्यालयातही अशीच गर्दी पाहायला मिळाली होती. तेव्हाही सोशल मीडियावर केंद्र सरकार जमीन-घरं देण्याची योजना बनवत असल्याचे मेसेज फिरत होते.

संबंधित बातम्या :

वाहतूक नियम मोडणं महागात पडणार, गडकरींचं बहुप्रतिक्षीत विधेयक मंजूर

खासदारांच्या बसण्याच्या जागा निश्चित, स्मृती इराणी पुढच्या रांगेत

विद्यार्थ्यांसाठी सर्वात चांगली शहरं, पहिल्या 100 मध्ये फक्त दोन भारतीय नावं

राजस्थानात मॉब लिंचिंगविरोधात कायदा, 10 वर्ष शिक्षा, लाखाच्या दंडाची तरतूद