AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजस्थानात मॉब लिंचिंगविरोधात कायदा, 10 वर्ष शिक्षा, लाखाच्या दंडाची तरतूद

देशात आतापर्यंत मोठ्या प्रमाणात मॉब लिचिंग (Mob Lynchings) सारख्या घटना घडल्या आहेत. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

राजस्थानात मॉब लिंचिंगविरोधात कायदा, 10 वर्ष शिक्षा, लाखाच्या दंडाची तरतूद
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 31, 2019 | 9:19 AM
Share

जयपूर (राजस्थान) : देशात आतापर्यंत जमावाकडून करण्यात येणारी मारहाण म्हणजेच मॉब लिंचिंग (Mob Lynchings) सारख्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या मॉब लिंचिंगवर (Mob Lynchings) रोख लावण्यासाठी राजस्थान सरकार नवीन कायदा करत आहे. ज्याचे नाव असेल ‘लिंचिंग संरक्षण विधेयक 2019’. मॉब लिंचिंगच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राजस्थान विधानसभेत काल (30 जुलै) एक विधेयक मांडण्यात आलं. हे विधेयक मंजूर झाल्यास गर्दीमध्ये सहभागी होऊन मारहाण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

मॉब लिंचिंग प्रकरणात दोषी आढळलेल्या व्यक्तीला 10 वर्षाचा कारावास आणि 1 लाख रुपये दंड भरावा लागेल. जर एखाद्या मॉब लिंचिंग प्रकरणाच्या व्हिडीओमध्ये मारहाण करणारे आणि तेथे उभे राहून पाहणारे या दोघांवरही कारवाई केली जाईल. यामध्ये त्यांच्यावर 25 हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी वरीष्ठ पातळीवरच्या अधिकाऱ्यांकडून केली जाईल.

या विधेयकात न्याय कुठे? भाजपाचा प्रश्न

जे लोक तिथे उभे असणार अशांवरही कारवाई करणार, तर यामध्ये न्याय कुठे, असा प्रश्न भाजप आमदार आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी केला. अशा प्रकरणांमध्ये काँग्रेसला फक्त आपली मतं दिसतात, अंसा आरोपही भाजपने काँग्रेसवर केला.

कसा असेल नवीन कायदा?

  • या कायद्यानुसार आरोपीला दहा वर्षाची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड आकारला जाईल.
  • जर कुठे मॉब लिंचिंगसारखी घटना घडली आणि तेथे अनेकजण ती घटना बघत असतील तर त्यानांही शिक्षा आणि 25 हजार रुपये दंड भरावा लागले.
  • मॉब लिंचिंग प्रकरणाची चौकशी उच्च पातळीवरील अधिकारी करतील.

काँग्रेस खासदारांनी बऱ्याचदा लोकसभेत मॉब लिंचिंगवर कायदा बनवण्यात यावा अशी मागणी केली आहे. पण अशा कायद्यावरुन लोकसभेत काही काम न केल्यामुळे काँग्रेसने मध्य प्रदेशात मॉब लिंचिंगबाबत कायदा तयार केला. आता राजस्थानमध्येही काँग्रेस आपल्या सरकारच्या माध्यमातून मॉब लिंचिंगबाबत कायदा तयार करत आहे.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती