AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्रीय निवडणूक आयोगामुळे उडाली भाजपची झोप, करोडो हिंदूंची नावे गायब; आता आखला नवा प्लान

केंद्रीय निवडणूक आयोगामुळे भाजपची झोप उडाली आहे. तर करोडो हिंदूंची नावे गायब झाल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे भाजपने आगामी निवडणुकीसाठी मोठा फ्लान आखल्याची चर्चा आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगामुळे उडाली भाजपची झोप, करोडो हिंदूंची नावे गायब; आता आखला नवा प्लान
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 14, 2026 | 2:52 PM
Share

उत्तर प्रदेशातील मतदार यादीतूनही कोट्यवधी हिंदू मतदारांची नावे गायब झाल्याचे समोर आलं आहे. हिंदू मतदारांची नावे गायब झाल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे. उत्तर प्रदेशातही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 1.27 कोटी हिंदू मतदारांची नावे हटवण्यावरून चिंता व्यक्त केली आहे. आयोगाच्या निर्णयानंतर भाजपने प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 10 हजार ते 25 हजार मतदारांची नावे पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचा मानस ठेवला आहे. गायब मतदारांपैकी 40 ते 80 लाख मते समाविष्ट व्हावीत, यासाठी भाजपचा प्रयत्न सुरू केले आहेत.

निवडणूक आयोगाकडून 20 नोव्हेंबरपासून एक अभियान राबवलं जाण्याची शक्यता आहे. तीन दिवसानंतर 17 नोव्हेंबर रोजी एसआयआर नंतर मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध केलं जाणार आहे.  त्यामुळे भाजपने पुढील एका महिन्यांसाठी मतदार यादीवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनौमध्ये शुक्रवारी भाजपची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष आणि प्रभारींना महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य , भाजप प्रदेशाध्यक्ष पकंज चौधरी उपस्थित होते.

भाजपने आखला निवडणुकीसाठी मोठा प्लान 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील 403 विधानसभा मतदारसंघात लक्ष केंद्रीत करून अभियान चालवलं जाणार आहे. भाजपच्या दाव्यानुसार, प्रत्येक मतदारसंघातील 31 हजारांहून अधिक मतदारांची नावे हटवण्यात आली आहे. त्यामुळे भाजप प्रत्येक मतदारसंघातील 10 हजार ते 25 हजार पात्र मतदारांचं नाव पुन्हा यादीत समाविष्ट करण्याचा भाजपचा मानस आहे. पक्षातील नेत्यांनी देखील बुथ पातळीवर मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. त्यानंतर फॉर्म भरण्याचे देखील निर्देश दिले आहेत. एका नेत्याच्या दाव्यानुसार, मुख्यमंत्र्‍यांनी कामाला शेवटची संधी असल्याचं कार्यकर्त्यांना म्हटलं.  शेवटच्या एका महिन्यात चांगला लाभ घ्यावा, अशी सूचना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे.   दरम्यान, उत्तर प्रदेशात पुढील वर्षांपासून विधानसभा निवडणुकींमुळे घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर इंडिया आघाडीत असलेल्या पक्षांनी देखील प्रयत्न सुरु केले आहेत.

Follow Us
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावले...
येडशीतील करांडे कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटलांनी घेतली भेट; बचावलेल्या मुलाची विचारपूस
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या..
छठपूजेसाठी बेस्टचा मोठा निर्णय! भाविकांसाठी 22 जादा बसेस, जाणून घ्या मार्ग
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; बैठकीत कोणत्या...
सुनेत्रा पवारांची वर्षा बंगल्यावरी बैठक संपली; मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद
जळगाव भूकंपाने हादरले! पेट्रोल पंपावरील CCTV मध्ये धक्क्यांचा थरार कैद, VIDEO व्हायरल
पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने..
Pune Case : पुण्यातील प्रसिद्ध वैशाली, रुपाली हॉटेलवर FDA ची मोठी कारवाई; परवाने रद्द!
विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; नेमकं काय..
Sanjay Raut On NCP Merger : विलिनीकरणाचा एक-दोन दिवसात 'द एंड' होईल, राऊतांचा दावा; असं काय म्हणाले?
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट,
भोसरीत मतदार यादीचा घोळ? तब्बल 15 हजार मतदारांची नावे दुसरीकडे शिफ्ट, अजित गव्हाणेंचा गंभीर आरोप!
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसे नेत्यांकडून जय्यत तयारी...
मालाडमध्ये छठपूजेचा उत्साह! मनसेच्या सुरेखा परब यांच्याकडून जय्यत तयारी, जोरदार बॅनरबाजी
मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात?
Ajit Pawar Poster Controversy : मुंबईनंतर पुण्यातही मफलरवाला पोस्टर; अजितदादांचा अपघात की घातपात? राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं....
Ajit Pawar : अजितदादांचा अपघात की घातपात? मुंबईत मफलर असलेलं पोस्टर झळकलं; 16 नोव्हेंबरला रोहित पवार मोठा खुलासा करणार?