AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाहतूक नियम मोडणं महागात पडणार, गडकरींचं बहुप्रतिक्षीत विधेयक मंजूर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे बहुप्रतिक्षीत मोटर वाहन संशोधन विधेयक 2019 (Motor Vehicle Act) आज (बुधवार, 31 जुलै) राज्यसभेत मंजूर झाले. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान झाले. यात 13 विरुद्ध 108 मतांनी विधेयकाला मान्यता मिळाली. त्यामुळे आता यापुढे वाहतूक नियम (Traffic rules) मोडणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच झटका बसणार आहे. विधेयक […]

वाहतूक नियम मोडणं महागात पडणार, गडकरींचं बहुप्रतिक्षीत विधेयक मंजूर
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Jul 31, 2019 | 11:42 PM
Share

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे बहुप्रतिक्षीत मोटर वाहन संशोधन विधेयक 2019 (Motor Vehicle Act) आज (बुधवार, 31 जुलै) राज्यसभेत मंजूर झाले. राज्यसभेत या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर मतदान झाले. यात 13 विरुद्ध 108 मतांनी विधेयकाला मान्यता मिळाली. त्यामुळे आता यापुढे वाहतूक नियम (Traffic rules) मोडणाऱ्या वाहनचालकांना चांगलाच झटका बसणार आहे.

विधेयक सादर करताना गडकरींनी 30 वर्षांपूर्वीच्या जुन्या कायद्यामुळे रस्त्यावरील दुर्घटनांवर नियंत्रण ठेवणे आणि वाहतूक शिस्तबद्ध करण्यात अपयश आल्याचेही नमूद केले. त्यासाठीच नव्या कायद्यात अनेक महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत.

अल्पवयीन मुलांकडून वाहन चालवणे, विना परवाना वाहतूक, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, दारु पिऊन गाडी चालवणे, निश्चित वेगापेक्षा अधिक वेगाना गाडी चालवणे, आणि निश्चित सीमेपेक्षा अधिक लोकांची वाहतूक करणे अशा अनेक गोष्टींसाठी कायद्यात शिक्षेची/दंडाची तरतुद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कायद्यात रुग्णवाहिकांना आपातकालीन स्थितीत पुढे जाण्यासाठी जागा न दिल्यास दंडाचे प्रावधान आहे.

नव्या मोटर वाहन (दुरुस्ती) कायद्यातील प्रमुख तरतुदी

मुलांसाठी

जुन्या कायद्यात मुलांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. मात्र, या नव्या कायद्यात सेक्शन 194-बी नुसार 4 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना कारमध्ये सीटबेल्ट तर दुचाकीवर हेल्मेट बंधनकारक असणार आहे. जर हे पाळले नाही तर वाहन मालकाला 1 हजार रुपयांचा दंड होईल.

‘रिकॉल ऑफ व्हेईकल’

या कायद्यामुळे पर्यावरणाला हानी करणाऱ्या आणि प्रदुषणाची निश्चित मर्यादा ओलांडणाऱ्या गाड्यांना बाजारातून हटवण्याचे अधिकार सरकारला मिळाले आहेत.

रस्ता निर्मितीतील चुकांसाठी थेट इंजिनिअर अथवा ठेकेदार दोषी

जन्या कायद्यात रोड निर्मितीतील दोषांमुळे अपघात झाल्यास दोषी ठेकेदार अथवा इंजिनिअरवर कारवाईची काहीही तरतुद नव्हती. मात्र, नव्या कायद्यात यासाठी विशेष तरतुद आहे. यात ठेकेदाराला 1 लाख रुपयांपर्यंत दंडही केला जाऊ शकतो.

लहान मुलांच्या हातात वाहन

लहान मुलांच्या हातात वाहन दिल्यास जुन्या कायद्यात 1 हजार रुपयांच्या दंडाची तरतुद होती. नव्या कायद्यात हा दंड 25 हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच 3 वर्षांची तुरुंगवासही ठेवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलावरही कायदेशीर कारवाई होईल.

‘हिट अँड रन’

जुन्या कायद्यात धडक देऊन फरार झालेल्या वाहन चालकावर पीडित जखमी असेल तर 12 हजार 500 रुपयांचा दंड होता. तसेच पीडिताचा मृत्यू झाले तर आरोपी वाहनचालकावर 25 हजार रुपयांच्या दंडाची तरतुद होती. मात्र, नव्या कायद्याने या गुन्ह्यांना अनुक्रमे 50 हजार आणि 2 लाख रुपये दंड ठेवण्यात आला आहे. 2018 मध्ये हिट अँड रनचे जवळपास 55 हजार प्रकरणे घडली आहेत. यात 22 हजार लोकांचा जीव गेला आहे.

रेसिंग करणे

आधी 500 रुपये दंड, तो आता 5000 रुपये

सीट बेल्ट

आधी 100 रुपये दंड, आता 1000 रुपये

हेल्मेट

आधी 100 रुपये  दंड, आता 1000 रुपये

विनाविमा वाहन

आधी 1000 रुपये दंड, आता 2000 रुपये दंड

वाहनाची सदोष बनावट

वाहनाच्या सदोष बनावटीमुळे अपघात झाल्यास डिलरवर 1 लाख आणि वाहन निर्माता कंपनीवर 100 कोटी रुपयांच्या दंडाची तरतुद करण्यात आली आहे.

ओव्हर स्पीड

आधी 400 रुपये दंड, आता 2 ते 4 हजार रुपये दंड

धोकादायक वाहतूक

आधी 1000 रुपये दंड, आता 5000 रुपये

दारु पिऊन वाहन चालवणे

आधी 2 हजार रुपये दंडाची तरतुद, आता 10 हजार रूपये दंडाची आणि तुरुंगवासाचीही तरतुद

Follow Us
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत...
अमित शाहांना मी फोनवर बोलताना पाहिलंय; दिल्ली लाठीचार्जबाबत राहुल गांधींचा धक्कादायक दावा
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्काराची घोषणा! वाचा विजेत्यांची यादी
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे...
नुसती धावपळ... आंदोलक थेट गाड्यांवर चढले अन्... शेतकरी आंदोलनामुळे भोपाळ शहरात तणाव, नेमकं प्रकरण काय?
तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता विना परवाना शाळांमध्ये...
Tukaram Mundhe | तुकाराम मुंढे यांचा मोठा निर्णय! आता परवाना नसेल तर शाळांमध्ये अन्न पुरवठा करता येणार नाही; 50 मीटर परिसरात...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन...
दिल्ली आंदोलनातील तरुणींवर कंगना रणौत यांची जहरी टीका; गटर जनरेशन म्हणत केलं वादग्रस्त वक्तव्य!
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside...
दिलीप वळसे पाटील- शरद पवार भेट, आणखी कोण कोण होतं उपस्थित? Inside Story समोर
हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
Abhijeet Dipke | हेच विद्यार्थी सरकार बदलतील; घरी परतताच अभिजीत दीपकेचा मोदी सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट?दावा...
मोठी बातमी! NDA मध्ये येताच सुप्रिया सुळेंना मिळणार मोठं गिफ्ट? दिल्लीतील हालचालीमागे... बड्या व्यक्तीच्या दाव्याने खळबळ
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया
तो सुखरूप घरी परतला हे आमच्यासाठी... अभिजीत दीपकेंच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात...
मोठी बातमी! दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला, पुण्यात घडामोडींना वेग